घरमहाराष्ट्रअनिल परब यांनी दापोलीत १० कोटींचं बेकायदेशीर रिसॉर्ट बांधलं; किरीट सोमय्यांचा आरोप

अनिल परब यांनी दापोलीत १० कोटींचं बेकायदेशीर रिसॉर्ट बांधलं; किरीट सोमय्यांचा आरोप

Subscribe

तपासाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची टीम जाणार, असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी दापोली येथे बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अनिल परब यांनी दापोलीत १० कोटींचं बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांना दिली. तसंच ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल विभागाकडे तक्रार केल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. तसंच, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची टीम दापोलीत दाखल होणार नसल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीत दापोली जवळील मुरुड समुद्र किनाऱअयावर लॉकडाऊनच्या काळआत म्हणजेच २०२० मध्ये अनिल परब यांनी आलिशान साई रिसॉर्ट बांधलं. जून २०१९ मध्ये अनिल परब यांनी जमीन घेतली. मात्र, सात बारा नावावर केलेला नाही आहे. तसंच २०२० मध्ये ठाकरे सरकारच्या अधिकारांचा दुरुपयोग करुन सगळे नियम धाब्यावर बसवून समुद्र किनाऱ्यावर, CRZ मध्ये आलिशान रिसॉर्ट बांधला. रिसॉर्ट बांधून झाल्यावर अनिल परब यांनी ते रिसॉर्ट २९ फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांचे भागीदार आणि शिवसेना नेते सदानंद कदम यांच्या नावावर केला, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -