घरताज्या घडामोडीपवारांच्या सरकारच्या काळातील दंगलीत बाळासाहेबांसोबत आम्हीही रस्त्यावर उतरलो होतो, सोमय्यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

पवारांच्या सरकारच्या काळातील दंगलीत बाळासाहेबांसोबत आम्हीही रस्त्यावर उतरलो होतो, सोमय्यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

Subscribe

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये दंगल आणि हिसांचार झाल्यानंतर सोमय्यांनी दौरा घोषित केला होता. परंतु अमरावतीमधील वातावरण तापलं असल्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यासाठी अमरावती पोलिसांकडून नोटीस आली होती. सोमय्यांनी अखेर अमरावतीमधील वातावरण आटोक्यात आल्यावर दौरा केला आहे. यावेळी दंगलीवरुन भाष्य करताना हिंदूंना निशाणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ९२-९३ साली शरद पवार यांचे सरकार असताना शिवसेना सोबत होती बाळासाहेबांसोबत हिंदूंना वाचवण्यासाठी रस्त्यावर होतो परंतु आता हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारवर असेल असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. अमरातवीमधील दंगलीवरुन बोलताना सोमय्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे. अमरावतीमध्ये १२ तारखेला घडलेल्या घटनेचे पोलीस आणि राज्य सरकारला विस्मरण झालेले दिसत आहे. कोणीही १२ तारखेला काय घडलं त्यावर राज्य सरकारमधील कोणीही मंत्री बोलत नाही यावरुन ठाकरे सरकारवरच्या आशीर्वादाने हे सगळं सुरु असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.

- Advertisement -

उद्धव ठाकरे ९३ची पुनरावृत्ती करतायत

१९९२-९३ मध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने जे केलं त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता पुनरावृत्ती करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून सोमय्या म्हणाले की, भलेही आम्ही एकत्रित नसू पण आम्ही एकत्रित होतो तेव्हा बाळासाहेबांसोबत हिंदूंना वाचवण्यासाठी रस्त्यावर होतो. मात्र त्यांचे सुपुत्र आता मुख्यमंत्रीपदासाठी समझोता करत असतील तर ते आम्ही चालू देणार नाही. या महाराष्ट्रात जर हिंदूंवर पुन्हा हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारवर असेल किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

१२ नोव्हेंबरच्या घटनेवर ठाकरे सरकारचे मौन

अमरावतीमध्ये मंत्री यशोमती ठाकरेंपासून सगळेजण १२ तारखेचा हिशोब का देत नाही. त्या दिवसाचे विस्मरण महाविकास आघाडी सरकार करत आहे. अमरावतीमध्ये मोर्चे काढण्यात आले. दंगा झाला याचा अर्थ यांच्या आशीर्वादाने मोर्चे काढण्यात आले आहेत. पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आली होती हे होऊ द्या असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : परमबीर सिंह – वाझे भेटीमुळे गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -