kirit somaiya- आणखी तीन बड्या नेत्यांची प्रकरण बाहेर काढणार

Kirit Somaiya
क्रांती शुगर कारखाना कवडीमोल भावात विकला, किरीट सोमय्यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत खळबळ उडवून टाकणारे भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा तीन बड्या नेत्यांची पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता हे तीन नवीन मंत्री कोण यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सोमय्या आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे साखर कारखान्याला भेट देण्यास आले होते. संबंधित साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच त्यासंबंधीची तक्रार कारखाना बचाव समितीने सोमय्यांकडे केली. यावेळी कामगार आणि शेतकऱ्यांबरोबर सोमय्या यांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी आपण केवळ आरोप करत नसून पुरावेही देतो असे म्हटले. यावर पूर्वाश्रमी राष्ट्रवादीचे व सध्या भाजपमध्ये असलेल्या नेत्यांच्या कारखान्यांविरोधातील तक्रारीतही लक्ष घालणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांची शहानिशा करुनच मी सामान्यांच्या पाठीशी उभा राहतो असे सोमय्या यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी माझ्याकडे अजून तीन बड्या नेत्यांची प्रकरणे आली असून लवकरच ती बाहेर काढणार असल्याचं व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही बाहेर काढणार असल्याचं सोमय्यांनी ठणकावून सांगितलं.