घरताज्या घडामोडीअनिल परब यांचा साई रिसॉर्ट पाडला जाणार, किरीट सोमैय्या यांचा दावा

अनिल परब यांचा साई रिसॉर्ट पाडला जाणार, किरीट सोमैय्या यांचा दावा

Subscribe

पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी येत्या २ दिवसांत अनिल परब यांच्या रिसॉर्टला भेट देणार

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बांधलेल्या साई रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार असल्याचा दावा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. काही दिवसांपुर्वी किरीट सोमैय्या यांनी दापोलीला जाऊन महाराष्ट्र जमीन महसून अधिनियम कलम ४५ अंतर्गत तक्रार केली आहे. तसेच आता येत्या २ दिवसांत पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी साई रिसॉर्टला भेट देणार असल्याची माहिती किरीट सोमैय्या यांनी दिली आहे. परब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोगय करुन सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत अनिधिकृत रिसॉर्ट बांधला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांचा पाय खोलात रुतत चालला आहे. सध्या अनिल परब यांच्याविरोधात ६ वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी सुरु आहे. यामध्ये आता दापोली रिसॉर्ट परब यांना भोवणार असल्याची चित्रे दिसत आहेत. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी येत्या २ दिवसांत अनिल परब यांच्या रिसॉर्टला भेट देणार आहेत. दिल्लीत या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. कोस्टल झोन अॅथॉरिटीच्या प्राथमिक अहवालानुसार साई रिसॉर्ट एनडीझेड(नो-डेव्हलपमेंट झोन) मध्ये रिसॉर्ट बांधण्यात आल्यामुळे हा रिसॉर्ट आता पाडण्यात येईल असा विश्वास असल्याचे किरीट सोमैय्या यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अनिल परब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन दापोलीमध्ये समुद्र किनारी रिसॉर्ट बांधला आहे. फसवणूक, दस्तावेज खाडाखोड केला आहे. किरीट सोमैय्या यांनी दापोलीमध्ये केलेल्या तक्रारीनंतर रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही सोमैय्या यांनी दिल्या आहेत. यामध्ये रिसॉर्टचे बांधकाम करताना बिनशर्ती परवानगी, रस्ता,घरपट्टी, आदींबाबत नियमांचे उल्लंघन केले आहे. का याबाबत चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी किरीट सोमैय्या यांनी परब यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२०…पर्यावरण संवर्धन अधिनियम कलम १५ महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५६ (अ), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४५ अंतर्गत तक्रार केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -