मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त असल्यामुळे मानेचा त्रास झाला, किरीट सोमय्यांचा घणाघात

kirit somaiya warning 4 leaders corruption exposed in few days and 40 scam till december
३१ डिसेंबरपर्यंत आणखी ४० घोटाळे लोकांच्या समोर आणणार, सोमय्यांचा अमरावतीमधून इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास होत होता. त्यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. राज्यातील विकासकामे आणि कोरोनाशी लढा देताना कामातून मान वर काढण्याची वेळ मिळाली नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावर माजी खासदार किरीट सोमय्यांनी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना पैसे मोजण्यातून वेळ मिळाला नाही त्यामुळे त्यांना मानेचा त्रास झाला असल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थनाही किरीट सोमय्यांनी केली आहे.

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी कामाच्या व्यापात मान वर करायला वेळ नव्हता असे मुख्यमंत्री म्हणाले असल्याचे सोमय्यांना सांगितले. यावर सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त होते. आकडे आणि कागदपत्रे देऊन सांगतो, स्वतःच्या पत्नीचे १९ बेकायदेशीर बंगले बांधले होते ते वाचवण्यात ते व्यस्त होते, सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर यांनी जो अनधिकृत बंगला बांधला होता तो बंगला वाचवण्यासाठी ते काम करत होते. अनिल परब यांनी कोविड काळात मार्च २०२० मध्ये वीजेचे कनेक्शन घेतलं आणि एका वर्षात १० कोटी रुपयांचा रिसॉर्ट बांधले. १ वर्षाच्या कोविड काळात अनिल परब यांनी रिसॉर्ट बांधले त्याला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यस्त होते. उद्धव ठाकरे स्वतःचे बिझनेस पार्टनर ज्यांची मुलुंडची जमीन वादग्रस्त, महाराष्ट्र सरकारने ६२ कोटीला ५ ऑक्टोबर २०२० मध्ये दिली आणि १० ऑक्टोबरला २१०० कोटीमध्ये विकत घेतली त्यात उद्धव ठाकरे व्यस्त होते असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुख्यमंत्री लवकर बरे व्हावे

सगळ्या लोकांना प्रकृतीसाठी आणि हे तर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी फक्त किरीट सोमय्या नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीक हे सुसंस्कृत आहेत त्यांना आपल्या हिंदू संस्कृतीचा अभिमान आहे. भले ते हिरवा रंगधारी झाले आहेत. पण आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी निश्चित प्रार्थना करतो आणि मुख्यमंत्री लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही किरीट सोमय्या यांनी केली आहे.


हेही वाचा :  बाळासाहेब असते तर त्यांनी थोबाडीत लगावली असती