कोविड सेंटर भ्रष्टाचार प्रकरणी किरीट सोमय्यांची आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार, म्हणाले रूग्णांच्या जीवाशी…

Kirit Somaiya warning After Sanjay Raut and yashwant jadhav next number is minister yashwant jadhav

भाजप नेते किरीट सोमय्या आझाद मैदानातील पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ८९ पानांची तक्रार अॅड. विवेकानंद गुप्ता यांच्यासह आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये सुपूर्द केली आहे. खासदार संजय राऊत यांचे पारिवारीक पार्टनर सुजित पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने कशापद्धतीने कोविड रूग्णांच्या जीवाशी खेळ करून करोडो रूपयांचा धंदा आणि व्यवसाय केला. यासंबंधातील सर्व पुरावे या पानांमध्ये आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.

मुंबई महापालिका आयुक्तांनी १३ कॉन्ट्रॅक्ट दिले

जी कंपनी अस्तित्वात नसून बोगस कागदपत्रं तयार करण्यात आली. ही कागदपत्र गोळा करून सुजित पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्तांनी १३ कॉन्ट्रॅक्ट दिले. तर पुणे महापालिकेने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर हे कॉन्ट्रक्ट दिले. हजारो कोटी रूग्णांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच बीएमएसला एमडीची पदवी देण्यात आली. या विरोधात फौजदारी कारवाई करावी. ठाकरे सरकारच्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या अर्थाने त्यांना कॉन्ट्रक्ट दिले. त्यानुसार ही कंपनीच अस्तित्वात नाहीये. परंतु त्यांच्यावर कारवाई करावी, अशी अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

आझाद मैदानातील पोलीस स्टेशनला इशारा

सात महिन्यात पोलिसांनी एफआयआर दाखल केली नाही. तर आझाद मैदानात पोलीस स्टेशनच्या विरोधात आम्ही आझाद मैदान कोर्टात तक्रार दाखल करणार, अशा इशारा आझाद मैदानातील पोलीस स्टेशनला दिला आहे.

ठाकरे पिता-पुत्रने मिळून करोडो रूपयांची खंडणी वसूल केली

ही कंपनी रजिस्टर ऑफ फर्ममध्येच नाहीये. राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी इटरनल हेल्थ केअर ही बोगस कंपनी सुरू केली. त्यानावे सुद्धा अर्ज करण्यात आला. परंतु याची चाचपणी केली असता सुजित पाटकर यांनी बोगस कागदपत्रे तयार केली आहेत. ज्या वकिलांचे हस्ताक्षर घेण्यात आले. त्या वकिलांनी सांगितलं की, हे माझे हस्ताक्षर नाहीयेत. ठाकरे पिता-पुत्रने मिळून शिवसेनेच्या माफीया सेनेच्या सरदारांसाठी करोडो रूपयांची खंडणी जीवाशी खेळून केलीय. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.


हेही वाचा : Fodder Scam Case: लालू प्रसाद यादवांच्या अडचणीत वाढ? चारा घोटाळा प्रकरणी आज अंतिम निकाल