घरताज्या घडामोडीKirit Somaiya : तुरुंगात जाण्याचा पुढचा क्रमांक परिवहन मंत्र्यांचा, किरीट सोमय्यांची टीका

Kirit Somaiya : तुरुंगात जाण्याचा पुढचा क्रमांक परिवहन मंत्र्यांचा, किरीट सोमय्यांची टीका

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कंपन्यांची पाहणी करण्यासाठी पुणे दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांनी पुण्यातील आयकर सदनला भेट दिली. मात्र, पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यानंतर पुढील क्रमांक राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचं असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.

तुरुंगात जाण्याचा पुढचा क्रमांक परिवहन मंत्र्यांचा

आता तुरूंगात जाण्याचा पुढील क्रमांक राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचं असल्याचं म्हणत त्यांनी लवकर बॅग भरावी. अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये अनिल परब हे किती खोटारडे आणि लबाड मंत्री आहेत हे समोर आलं, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली.

- Advertisement -

नरेंद्र मोदी सरकारने दापोली कोर्टात केस केली. त्यामध्ये सर्व पुरावे देण्यात आले आहेत. म्हणून आता अनिल परब यांनी लवकर बॅग भरावी, असा इशारा अनिल परब यांनी सोमय्यांना दिला आहे.

हसन मुश्रीफ यांची १०० कोटींहून अधिक बेनामी संपत्तीची यादी आम्ही आयकर विभागाला दिली आहे. मरू भुमींग १६ कोटी रूपये आणि इतर अनेक संपत्तींसह मुश्रीफ कुटुंबियांची १०० कोटींहून अधिक बेनामी संपत्ती आहे. त्यांनी मनी लॉंण्ड्रींग केल्यानंतर ४७ कंपन्यांमधून पैसे आले आहेत. तसेच अजून चौकशी केल्यानंतर जवळपास १०० कंपन्या असण्याची शक्यता किरीट सोमय्यांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

हसन मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती जप्त करा

हसन मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली पाहीजे, अशी आमची मागणी आहे. हे पैसे नक्की कोणत्या कंत्राटदाराकडून आले आहेत. त्याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे आणि पवारांची आहे. पैसा हा भ्रष्टाचाराचा असल्यामुळे त्याची चौकशी ठाकरे आणि पवारांनी का सुरू केली नाही. १५८ कोटींची माहिती ही कन्फर्म आहे. मात्र, आता मोदी सरकारने मुश्रीफ यांच्यावर पुणे कोर्टात कंपनी मंत्रालयाने अधिकृतपणे फौजदारी याचिका दाखल केली आहे.


हेही वाचा : ॲड. सतीश उकेंना ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी, मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -