घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र "माफिया"मुक्त, आता मुंबई महापालिका माफियामुक्त करणार, सोमय्यांचा सूचक इशारा

महाराष्ट्र “माफिया”मुक्त, आता मुंबई महापालिका माफियामुक्त करणार, सोमय्यांचा सूचक इशारा

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी दोन ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात माफीया महाराष्ट्र “माफिया” मुक्त, असे शब्द वापरले आहेत.

यातील एका ट्विट मध्ये त्यांनी महाराष्ट्र “माफिया” मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार, असे म्हटले आहे. यामुळे भाजपचे पुढचे लक्ष मुंबई महापालीका असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भाईंदर, वसई, नवी मुंबई, पनवेल …….. मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

किरीट सोमय्यांची घाटकोपर बैठकीत टीका –

किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या पारशीवाडीमध्ये बैठक घेतली. यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही मला तोतरा म्हणा, टमरेल म्हणा.. आपले प्रवक्ते संजय राऊत यांनी मला भ*** म्हटले. तुम्ही मला काही म्हणा, पण हिशोब तर द्यावाच लागणार. 19 बंगल्यांच्या घोटाळ्याचा हिशोब घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं ते म्हणाले आहेत. आम्हाला धमक्या देत आहेत, माफिया सरकार आणि त्यांचे प्रवक्ते, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -