घरताज्या घडामोडीपुण्यात झालेल्या हल्ल्यातील ६४ शिवसेना गुंडांना अटक करा, किरीट सोमय्यांची मागणी

पुण्यात झालेल्या हल्ल्यातील ६४ शिवसेना गुंडांना अटक करा, किरीट सोमय्यांची मागणी

Subscribe

किरीट सोमय्यांनी आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५ अंतर्गत शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुणे दौऱ्यादरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच धक्काबुक्कीत सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले होते. यामुळे त्यांना इजा देखील झाली होती. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली असून पुणे महानगरपालिकेतही पुण्यातील कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याचे निवेदन दिले आहे. यातील ११ जणांना अटक करण्यात आली असून आणखी ६४ जणांना अटक करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे.

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या ५ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर होते. पुणे दौऱ्यादरम्यान सोमय्या शिवाजी नगर पुणे जंबो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत पार्टनर सुजित पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करणार होते. यावेळी तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमय्यांचा ताफा अडवला होता. तसेच त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यानंतर सोमय्या पुणे महानगरपालिकेत गेल्यावर त्यांना निवेदन देण्यापासून रोखण्यात आले. किरीट सोमय्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. धक्काबुक्कीमध्ये सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही परंतु मुका मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

सोमय्यांनी रुग्णलायातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी कारवाई करत शिवसेनेच्या ११ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. परंतु या हल्ल्यात सहभागी असलेल्या ६४ जणांनासुद्धा अटक करण्यात यावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्यांनी आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५ अंतर्गत शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा : ‘सत्यमेव जयते’ म्हणत राऊतांचं ट्विट; मोदी सरकारविरोधात थेट उपराष्ट्रपती नायडूंना पत्र

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -