पवार कुटुंबाचा साखर कारखान्यांत मोठा घोटाळा, सोमैय्यांची रोहित पवारांच्या चौकशीची मागणी

राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करुन ५० कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला

kirit Somaiya

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार याच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. जरंडेश्वर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे पुरावे ई़डीला सापडले असल्यामुळे ही कारखाना सील करण्यात आला आहे. याबाबत अजित पवार यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी शालिनी पाटील यांनी केली आहे. यावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. पवार कुटुंबाने साखर कारखान्यांमध्ये मोठा घोटाळा केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधातही कारवाई करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमैय्या यांनी केली आहे.

साखर कारखान्यांच्या व्यवहारामध्ये पवार कुटुंबाने मोठा घोटाळा केला आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही साखर कारखाना खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा केला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याच्या व्यवहारात रोहित पवार यांनी घोटाळा केला आहे. या कारखान्याला विकताना कमी किंमत केल्याचा आरोप रोहित पवार यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच राज्य सहकारी बँकेतही पवार कुटुंबाने घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

पवार कुटुंबाने शिखर बँकेत घोटाळा केल्यानंतर अनेक कारखाने लाटले आहेत. रोहित पवार यांनी राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करुन ५० कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला. यानंतर बारामती अॅग्रो साखर कारखाना रोहित पवार यांनी विकत घेतला आहे. याबाबतही ईडीने तपास करायला पाहिजे. महाराष्ट्र राज्य बँकेतील मोठा घोटाळा करण्यात आला आहे हा घोटाळा पवार कुटुंबाने केला असल्याचे आरोप किरीट सोमैय्या यांनी केला असून चौकशीची मागणी केली आहे.

जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची जप्ती

जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीकडून जप्ती आणली गेली. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात होता. या कारखान्याचा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१० मध्ये लिलाव करण्यात आला होता. साखर कारखान्याच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीने विकला गेला असल्याचे ईडीला तपासात आढळले आहे. यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. २०१० च्या लिलावामध्ये जरंडेश्वर साखर कारखाना ६५ कोटींच्या रुपयांना विकण्यात आला होता. हा साखर कारखाना गुरु कमोडिटी या कंपनीने खरेदी केला होता. यानंतर तो जरंडेश्वर शुगर्स कंपनीला भाडेतत्वावर दिला होता. सध्या हा कारखाना अजित पवार यांचे नातेवाईक चालवत होते. अजित पवार यांनी आपल्या या कारखान्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे.