घरताज्या घडामोडीपोलिसांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणाची चौकशी होणार, किरीट सोमैया यांची माहिती

पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणाची चौकशी होणार, किरीट सोमैया यांची माहिती

Subscribe

हल्ला करणाऱ्या मुजोर पोलिसांचे निलंबन करा

जालना जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची तोडफोड केल्यामुळे भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले असा पोलिसांनी मारहाण केलेल्या युवकाचे नाव आहे. कोविड रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त जमावाने रुग्णालयावर धावा बोलून रुग्णालयाची तोडफोड केली. रुग्णालयात पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांसोबत हुज्जतही या कार्यकर्त्याने घातली. त्यामुळे पोलिसांनी काठीचा वापर करुन कार्यकर्त्याला बेदम मारले होते या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यामुळे ही घटना अधिकच चर्चिली गेली आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले आणि इतर कार्यकर्त्यांना जालन्यातील रुग्णालयात जाऊन तोडफोड केली होती. ९ एप्रिलला एका युवकाचा अपघात झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरुन रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. हे रुग्णालय कोविड सेंटर होते यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत तोडफोड करणाऱ्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

जमावाने पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर संतप्त पोलिसांनी युवकांवर लाठीमार केला. यामध्ये भाजप कार्यकर्त्याला पोलिसांच्या हातामधली काठी तुटेपर्यंत मारण्यात आले. ही घटना ९ एप्रिल रोजीची आहे. जवळपास दीड महिन्यानंतर या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे हे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिस अधीक्षक एसपी देशमुख यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

किरिटी सोमैया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले, जालना यांना दीपक हॉस्पिटल येथे ९ एप्रिल रोजी पोलिसांनी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ आत्ता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ह्या प्रकरणात आज पोलिस अधीक्षक एसपी देशमुख यांच्यासोबत बोललो, त्यांनी चौकशी करण्याचे मान्य केले आहे. अशी माहिती किरीट सोमैया यांनी दिली आहे.

हल्ला करणाऱ्या मुजोर पोलिसांचे निलंबन करा

जालना भाजपा युवा कार्यकर्ता शिवराज याला ज्या पध्दतीने मारहाण केली हे अतिशय संतापजनक आहे . एसपी देशमुख यांना मी फोन केला तर म्हणतात चौकशी करून कारवाई करतो. सरळ सरळ जर व्हिडिओ मध्ये मारहाण करताना दिसत आहेत तर चौकशी कसली करता.? जनावराला सुद्धा अशा पद्धतीने मारहाण कोणी करणार नाही.जालना शहरातील पोलिसांनी या तरुणाला निर्दयी मारहाण केली आहे, तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. निलंबन करा. अमानुष हल्ला करणाऱ्या मुजोर पोलिसांचे निलंबन होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही असे भाजप आमदार राम सातपुते यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -