घरताज्या घडामोडीपवारांनी कितीही प्रमाणपत्रे दिली तरीही, महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करणारच - किरीट सोमय्या

पवारांनी कितीही प्रमाणपत्रे दिली तरीही, महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करणारच – किरीट सोमय्या

Subscribe

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भावना गवळी प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केले आहे. भावना गवळींचा ५५ कोटींचा घोटाळा शरद पवारांना दिसत नाही का ? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. शरद पवार ठाकरे सरकारला गाईड करत आहेत. आम्ही या प्रकरणात केलेल्या तक्रारीनंतर केंद्राने महाराष्ट्र सरकारला कळवले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने चौकशी समिती नेमली खरी, पण ही चौकशी समिती ही २१ दिवसानंतर बरखास्त केली. या संपुर्ण प्रकरणात भावना गवळींकडे ७ कोटी रूपये आले कुठून याचा खुलासा करावा ? शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचे असेल तर खुलेआम सांगावे, असेही सोमय्या यावेळी म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणातही शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्र दिली तरीही, आम्ही महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम सुरू ठेवणार असल्याचेही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले. अनिल देशमुखांच्या पाठोपाठच शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना, अजित पवारांना वाचवत असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पवारांच्या भूमिकेवर टीका केली. (Kirit somaiya made allegation on sharad pawar for safeguarding bhavana gawali & Anil Deshmukh )

भावना गवळी यांनी ७ कोटींची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार मे २०२० मध्ये केली. पण प्रत्यक्ष घटना ही ७ जुलै २०१९ मध्ये घडली होती. मग इतक्या मोठ्या रकमेच्या घटनेनंतर १० महिने का शांत होता ? आपल्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत. मग या प्रकरणात एफआयआर १० महिन्यांनी का झाली ? या प्रकरणात आता २४ महिने झाल्याचेही ते म्हणाले. भावना गवळींनी अध्यक्ष असताना ५५ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला. या संपुर्ण प्रकरणात भावना गवळींनी ५५ कोटी ढापल्याचेही ते म्हणाले. या संपुर्ण भ्रष्टाचारात ४० वेळा रोख रक्कम काढण्यात आली. प्रत्येकवेळी २० लाखांहून अधिक कॅश काढण्यात आल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

जरंडेश्वर साखर कारखान्याचा ५५ कोटींचा लिलाव झाला. अजित पवारांनी ६५ कोटी रूपयांमध्ये हा साखर कारखाना विकत घेतला. या संपुर्ण प्रकरणात ७०० कोटी रूपयांचे कर्ज घेतले. पण ७०० कोटी कर्जासाठी १ हजार कोटींची इतके मालमत्तेचे व्हॅल्यूएशन लागते. हे सगळे अहवाल कोणी तयार केले असाही सवाल त्यांनी यावेळी केला. यासाठीच सहकार चळवळ हवेय का ? असेही किरीट सोमय्या म्हणाले. हे सगळे पैसे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून काढण्याच आले. म्हणून मी पवारांना सांगू इच्छितो की, पवारांनी कितीही प्रमाणपत्र दिली तरीही महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम सुरू राहणार असल्याचे किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – ‘सत्य परेशान हो सकता है लेकीन…’, महाराष्ट्र सदनप्रकरणी दोषमुक्त झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -