Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाल्याने ते भाईंची मदत घेतायत, किरीट सोमय्यांचा आरोप

माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाल्याने ते भाईंची मदत घेतायत, किरीट सोमय्यांचा आरोप

Related Story

- Advertisement -

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र, हे मंत्री कोण आहेत? आणि कोणत्या भाईंची मदत घेत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

किरीट सोमय्या आज ठाणे महापालिकेत आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. आयुक्तांना भेटण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर त्यांनी हा गंभीर आरोप केला. ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोपमोड झाली आहे. काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहे, असं सांगतानाच वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. तसं रिपोर्टमध्येही आलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या गृह मंत्र्यांनी मला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या गुंडांकडून मला गोळ्या घालण्याची धमकी

- Advertisement -

मी माझे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक जण घोटाळेबाज आहेत. उद्धव ठाकरे यांचे गुंड मला गोळ्या घालण्याच्या धमक्या देत आहेत. पण मी सुरक्षा मागितली नाही. मागणारही नाही. माझाबाबत जी धमकी आली ते फक्त नाटक आहेय नुसती एनसी पोलिसांनी घेतली, असंही ते म्हणाले.

 

- Advertisement -