सोमय्यांनी मनसुख हिरेन कुटुंबीयांची घेतली भेट; आता ‘एनआयए’ची भेट घेणार

kirit somaiya meet mansukh hiren family pradip sharma sachin waze
सोमय्यांनी मनसुख हिरेन कुटुंबीयांची घेतली भेट; आता 'एनआयए'ची भेट घेणार

भाजप नेते किरीट सोमय्यांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत येईल असे प्रयत्न केले जात आहे. सरकारमधील विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप करण्याचं सत्र सोमय्यांनी सुरु केले आहे. सध्या त्यांनी मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. 35 मिनिटांच्या या भेटीदरम्यान त्यांनी मनसुख हिरेन यांचे भाऊ विनोद त्यांची दोन्ही मुलं, पत्नी यांच्याशी चर्चा केली. तसेच या प्रकरणी पुढच्या आठवड्यात ते
एनआयएची भेट घेणार असल्याची माहिती दिली. यावेळी किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजप आमदार संजय केळकर, आमदार आणि भाजप अध्यक्ष निरंजन डावखरे उपस्थित होते. यावेळी सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसुख हिरेनच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया 

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले की, “मनसुख हिरेन कुटुंबियांच्या वेदना अद्याप कमी झालेल्या नाहीत. ज्या यातना त्यांना उद्धव ठाकरेंच्या उद्धट सरकारमुळे सहन कराव्या लागल्या. या प्रकरणात परवा दिलासा मिळाला तो म्हणजे एनआयएची महत्त्ववाची एफीडेव्हिट फाईल झाली आहे. त्यामुळे हिरेन कुटुंबियांना धीर मिळाला आहे. आज त्यांची परिवाराशी पुढच्या अॅक्शन प्लॅन संदर्भात विस्तृत चर्चा केली.”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनसुख हिरेन कुटुंबियांची माफी मागावी” 

“आत्ताची चार्जशीट हा पहिला पार्ट आहे. आता हे सिध्द झालं. पण मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना पहिले दोन चार दिवस आठवत आहे की, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या माफिया पोलिसांनी मनसुख हिरेनला हत्यारा, वसुलीखोर, ब्लॉक मेलर अशाप्रकारचं जे चित्र उभं केलं होतं.” असा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसुख हिरेन कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

“या प्रकरणी एनआयएची भेट घेणार”

“मुख्यमंत्री आहात आपण,… एका निर्दोष व्यक्तीचा उद्धव ठाकरेंनी दोन माफियांना पोलीस दलात ठेवून हत्या केली, हे दोन्ही तुमच्य़ा पक्षाचे प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे… 100 कोटींचे टार्गेट हे तुमच्या सरकारने दिले. त्यामुळे हे दोन वसुलीखोर निर्दोष लोकांच्या सुपाऱ्या घेऊन आज या परिवाराला अनाथ, निराधार करण्याचे पाप या उद्धव ठाकरे सरकारने केले आहे. एनआयएची भेट घेत हा तपास पुढे चालावा, या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या त्याच्या फायली शोधाव्या आणि हे कोणाच्या आदेशावर झाले त्या व्य़क्तीविरोधातही गुन्हा नोंदवला पाहिजे” अशी मागणी करणार असल्याचेही सोमय्यांनी जाहीर केले आहे.

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचा भोंगा, सोमय्यांची टीका 

“अनिल देशमुख, अनिल परब यांच्या वसुलीप्रकरणात मनसुख हिरेनची हत्या झाली आहे. मी आठव्यांदा या परिवाराची भेट घेतली.संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचा भोंगा आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणावरून लक्ष हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मी आठव्यांदा या हिरेन परिवाराची भेट घेतली. त्यामुळे हे जेव्हा लुटारू ठरतात. मनी लॉड्रिंगमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट होते तेव्हा त्यांच्याकडून दगड मारणं, हत्या करण्याचा प्रयत्न करणे सुरु असते” असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.


इंदौरमधील इमारतीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू, 8 जखमी; मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत