घरताज्या घडामोडीठाकरे बाप-बेटे राणेंना घाबरतात का?, २१ महिन्यांनंतरही बंगल्यावर कारवाई नाही - किरीट...

ठाकरे बाप-बेटे राणेंना घाबरतात का?, २१ महिन्यांनंतरही बंगल्यावर कारवाई नाही – किरीट सोमय्या

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला अनधिकृत असेल तर त्यांच्या बंगल्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही ?

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा १०० कोटींचा तिसरा घोटाळा उघड केला आहे. यावेळी सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. की, तुम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना घाबरता का? सत्तेत आल्यापासून २१ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला तरी त्यांच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना केला आहे. किरीट राणेंचा बंगला राज्यांर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. यामुळे ठाकरे सरकारने मुख्यमंत्री उद्धव टाकरेंवर घणाघात केला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला आहे. कोल्हापूरातून पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा बाहेर काढला आहे. यावेळी त्यांना नारायण राणेंच्याबाबतीत प्रश्न विचारण्यात आला होता. राणेंच्या बंगल्यावरुन सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला अनधिकृत असेल तर त्यांच्या बंगल्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल किरीट सोमय्या यांनी ठाकरे पिता-पुत्रांना केला आहे.

- Advertisement -

प्रकरण काय?

राणेंच्या बंगल्यावरील कारवाईवरुन भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सोमय्या यांनी म्हटलं आहे की, राणेंचा बंगला अनधिकृत असेल त्यावर कारवाई ही राज्य सरकारच्या आखत्यारित येते. त्यामुळे राज्य सरकारने कारवाई करावी असा निशाणा किरीट सोमय्या यांनी सांधला आहे.


हेही वाचा : हसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग धारण करावा

सोमय्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर बोट ठेवला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना जिल्ह्यात प्रवेश न करण्याची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर सोमय्यांच्या मुंबईतील घराबाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. यानंतर सोमय्यांना गणेश विसर्जनासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. सीएसटीच्या बाहेर पोलिसांनी धक्काबुक्की केली, स्थानकाबाहेर आडवलं असल्याचे सोमय्यांनी सांगितले आहे.

कोल्हापूरला जाण्यापासून पोलीसांनी रोखल्यानंतर सोमय्यांनी पोलिसांना विचारले की, कोणत्या अधिकारांतर्गत थांबवत आहे. त्यांना सांगितले तुम्हाला असं थांबवता येणार नाही त्यावेळी त्या ऑर्डरला चॅलेंज दिले तेव्हा पोलीस पळून गेले. कोल्हापूर पोलिसांनी मला खरा ऑर्डर दाखवला, त्या ऑर्डरमध्ये सोमय्यांना घराबाहेर पडू देऊ नका असे कुठेच नाही. ठाकरे सरकारचे पोलीस खोट्या ऑर्डर दाखवतात आणि आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणतात, आम्ही हिंदू आहे तर गुन्हा केला का? ठाकरे सरकारने हिरवा रंग घेतला आहे. ठाकरे सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.


हेही वाचा :Kirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते? वाचा सविस्तर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -