घरताज्या घडामोडीभावना गवळींना ईडी चौकशीला जाण्यास कशाची भीती वाटते, किरीट सोमय्यांचा सवाल

भावना गवळींना ईडी चौकशीला जाण्यास कशाची भीती वाटते, किरीट सोमय्यांचा सवाल

Subscribe

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना चौथ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने भावना गवळी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु भावना गवळी चौकशीसाठी आल्या नाहीत. यामुळे भावना गवळींना कशाची भीती वाटते असा सवाल भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. १०० कोटी भ्रष्टाचार प्रकरणी भावना गवळींना हिशोब तर द्यावाच लागेल असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. तसेच चौकशीला हजर न राहिल्यामुळे भावना गवळी यांच्याविरोधात ईडी आता अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने समन्स पाठवले आहे. शिवसेना खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला ईडीने अटक केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. भावना गवळी चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांना चौथे समन्स देण्यात आले आहेत. पंरतु त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. तर १०० कोटींचा घोटाळा आपण केला नाही तर मग घाबरता कशाला हिशोब तर द्यावा लागणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. चौथे समन्स, पाचवे समन्स कधीतरी कोणी मग कोर्टात जाणार मग वॉरंट निघणार त्यापेक्षा पैसे जमा करा असे सोमय्या म्हणाले आहेत.

- Advertisement -

मर्सिडीज बेबी म्हणत सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

आदित्य ठाकरेंना मी मर्सिडीज बेबी असे म्हणणार नाही. ७ कोटींची एन्ट्री तुमच्या खात्यात आली आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडून आलेली आहे. या आदित्य ठाकरेंना याचे उत्तर द्यावेच लागणार आहे. आदित्य ठाकरेंनी यापूर्वीच्या काहीही गोष्टी बोलाव्यात परंतु यावेळच्या ७ कोटींचा हिशोब तर द्या ना, हिशोब तर द्यावाच लागणार आहे. मामा श्रीधर पाटणकरांची ७ कोटींची मालमत्ता जोडले गेले. आदित्य ठाकरेंनी जर ७ कोटींचा हिशोब नाही दिला तर मी ईडीकडे जाणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलं; संजय राऊतांचा टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -