घरताज्या घडामोडीपालकमंत्री अनिल परबांना साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे मान्य मग कारवाई का नाही?...

पालकमंत्री अनिल परबांना साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे मान्य मग कारवाई का नाही? सोमय्यांचा सवाल

Subscribe

अनिल परबांच्या भुताने रिसॉर्ट बांधला असेल तर त्यांच्या भूताला अटक करा आणि त्यावर कारवाई करा असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे. प्रॉपर्टी टॅक्स भरला, वीज कनेक्शन घेतलं नाही ते पैसे भरत आहेत याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असताना अद्याप कारवाई का? करण्यात आली नाही असा प्रश्न भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. परिवहन मंत्री आणि स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनासुद्धा हा रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे मान्य आहे. परंतु कारवाई का होत नाही असा सवाल सोमय्यांनी केला आहे. अनिल परबांच्या नावे प्रॉपर्टी टॅक्स भरण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी सांगावे की त्यांच्या नावे कोणी टॅक्स भरला याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज जिल्हाधिकारी आणि एसपींची भेट घेतली. दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याबाबतचा आढावा घेऊन यावर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल सोमय्यांनी केला आहे. भारत सरकारने साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले. ९० दिवसांत पूर्वीच आधीसारखी साफ करण्याचे निर्देश दिले आहेत. सीआझेडनुसार फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारमध्ये कारवाई करण्यासंदर्भात गोंधळ

आज मी त्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि एसपींची भेट घेतली. नोटीस त्यांना सुपूर्द करण्यात आली आहे. क्रिमीनल फौजदारी कारवाई संदर्भात माहाराष्ट्र सरकार गोंधळ गडबड करत आहे. यासंदर्भात अनेकवेळा चर्चा झाली असून पुरावे देण्यात आले आहेत. यामध्ये दोन विषय आहेत. तो रिसॉर्ट गैरकायदेशीर असल्याचे जिल्हाधिकारींपासून, महसूल मंत्रालय, महाराष्ट्र सरकारपर्यंत सगळे मान्य करत आहेत. महाराष्ट्र सरकार महसूल विभागाकडे जो एनए दिला होता तो फोर्जरी करुन दिला होता असा महाराष्ट्र सरकारने आदेश दिला होता असे किरीट सोमय्या म्हणाले.

जो एनए दिला होता तो ५०० मीटरमध्ये बांधकाम करण्यासंदर्भात दिली होता. परंतु हे बांधकाम १७०० मीटरपेक्षा जास्त दिला आहे. महाराष्ट्र सरकारने कारवाई सुरु केली आहे. एमआरटीपी अॅक्ट जो आहे यामध्ये कारवाई करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. यामध्ये रिसॉर्ट पाडण्याची कारवाई आणि दुसरा ज्याने बांधकाम केले त्यावर कारवाई, परंतु जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र सरकार महसूल विभागाने अद्याप कारवाई करण्याची पद्धत सुरु केली नाही. एनए रद्द केला मग फौजदारी कारवाई का झाली नाही असा सवालही सोमय्यांनी केला आहे.

- Advertisement -

अनिल परबांना मान्य मग कारवाई का नाही?

रिसॉर्ट प्रकरणात फौजदारी करावाई करायची आहे. पण कोणाविरोधात करायची, महाराष्ट्र सरकार उडवा उडवी करत आहे. अनिल परब काय बोलतात हे समजत नाही. माझा कथिक संबंध काय, अनधिकृत असेल तर कारवाई करा जर तेच पालकमंत्री असून असे म्हणत असतील तर त्यांनी कारवाई केली पाहिजेत तुम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. जर अनिल परबांच्या भुताने रिसॉर्ट बांधला असेल तर त्यांच्या भूताला अटक करा आणि त्यावर कारवाई करा असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे. प्रॉपर्टी टॅक्स भरला, वीज कनेक्शन घेतलं नाही ते पैसे भरत आहेत याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.


हेही वाचा : औष्णिक प्रकल्पातील राख टाकणं बंद करा, आदित्य ठाकरेंचे वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -