घरताज्या घडामोडीआनंद अडसूळांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला, पैशांच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार :...

आनंद अडसूळांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला, पैशांच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार : किरीट सोमय्या

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नेते आनंद अडसूळ यांची जामीन याचिका स्वीकारली नाही. आतापर्यंत आनंद अडसूळ यांनी सीटी बँकेचे ९८० कोटी रूपये लुटले आहेत. तसेच लाखो खाते दारांचे पैसे गायब केले आहेत. त्यामुळे आता जरी जागे व्हा. आनंद अडसूळ असो किंवा भावना गवळी असो त्यांना ईडीच्या सामोरे जावे लागणार आणि त्यांना एक-एक पैशांच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार असल्याचं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत आनंद अडसूळांची जामीन याचिका मुंबई न्यायालायने फेटाळली आहे. शिवसेनेचे घोटाळेबाज नेते आनंद अडसूळ, भावना गवळी, अर्जुन खोतकर यांना ED ईडीच्या चौकशाली सामोरे जावे लागणार, किती दिवस पळत राहणार, घोटाळ्यांचा पैसेचा हिशोब तर द्यावाच लागणार अशा प्रकारचं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

- Advertisement -

सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. गेल्या महिन्यातही आनंद अडसूळ यांनी मंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ती याचिकाही हायकोर्टाने फेटाळली होती.

- Advertisement -

आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत सुमारे ९८० कोटी रूपयांचा गैरव्यवहर झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान, ईडीची कारवाई सुरू असताना त्यांनी कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र, त्या याचिकेची उच्च न्यायालयाचे न्या. एस.एस. शिंदे यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली होती.

दरम्यान, आनंद अडसूळ आणि त्यांचा पुत्र अभिजीत अडसूल यांच्याविरोधात मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने चौकशी केली होती. या प्रकरणात ईडीने अमरावती आणि मुंबईच्या कार्यालयांवर छापे देखील मारले होते. त्यानंतर या दोघांनाही चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स देखील बजावण्यात आले होते. त्यामुळे अडसूळ यांनी वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.


हेही वाचा: Omicron variant : ओमिक्रॉन व्हेरियंटला रोखण्यासाठी काय आहेत उपाय?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -