राणा दामप्त्याच्या जेलमधील अनुभवाने इंग्रजांच्या जेलची आठवण झाली, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जेलमधील त्यांचा अनुभव सांगितला. जेलमधील अनुभव ऐकल्यानंतर इंग्रजांच्या काळातील जेलची आठवण झाली अशी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर किरीट सोमय्यांनी निशाणा साधला आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांना सामाजिक तेढ निर्माण केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा यांना जेलमधुन सोडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्पाँडेलिसिसचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेतली आहे. सोमय्यांनी राणा दाम्पत्यांला तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांची माहिती घेतली आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्यांनी राज्यातील जेलची तुलना इंग्रंजांच्या काळातील जेलशी केली आहे. सोमय्या म्हणाले की, नवनीत राणा आणि रवी राणांचे जेलमधले अनुभव ऐकल्यानंतर हे जेल इंग्रजांच्या काळातील जेल आहेत का? याची आठवण झाली आहे. त्या खासदार , आमदार आहेत. ते बाजूला ठेवा पण ज्या पद्धतीने अत्याचार या उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारने हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांवर केली आहे. त्याला हनुमान आणि राम माफ करणार नाही परंतु महाराष्ट्राती जनता माफ करणार नाही. अत्यंत दुर्दैव आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर तात्काळ उपचार सुरु झाले पाहिजे. डॉक्टरांनी पूर्ण तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहेत. उद्या आणखी काही तपासणी करण्यात येणार आहे. रवी राणांना मानसिक धक्का बसला आहे. प्रत्येक भारतीयांना जेलमध्ये जे अत्याचार झाले ही यातनेची कथा कोणालाच पटत नाही. प्रत्येकाला असे वाटतं की, देव या माफिया सरकारच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देईल असे किरीट सोमय्या म्हणाले आहे.

नवनीत राणांना अश्रू अनावर

नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवी राणा यांनी तळोजा कारागृहातुन सुटल्यानंतर थेट लिलावती रुग्णलयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली आहे. रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा भावूक झाल्या आहेत. त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी रवी राणा यांच्या देखील अश्रूंचा बांध फुटला होता. परंतु त्यांनी स्वतःला सावरुन पत्नीला धीर दिला आहे.


हेही वाचा : राणा दामप्त्याच्या जेलमधील अनुभवाने इंग्रजांच्या जेलची आठवण झाली, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया