अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी पोलखोल करणार – सोमय्या

kirit Somaiya slams ajit pawar netflix web series on Ajit Pawar
अजित पवारांवर वेब सीरिज केल्यास ३०० कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांची खोचक टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागाने धाडी टाकलेल्या असताना आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवा इशारा दिला आहे. अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी अजून एक पोलखोल करणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. त्यामुळे सोमय्या नेमकं कोणत्या गोष्टींचा उलगडा करणार आहेत याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

किरीट सोमय्या यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बुधवारी मी पुन्हा एकदा पुण्यात जाणार आहे. अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची अजून एक पोलखोल करणार आहे. यांनी अनेक घोटाळे केले आहेत. लूट माजवली आहे. पवार शेतकरी दादा शेतकरी दादा म्हणत असतात पण रोहित पवार, सुनेत्रा पवार यांच्या नावावर कारखाने आहेत आणि ते लूटत आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? असा प्रश्न विचारला आहे. जरंडेश्वरचा मालक कोण? कीती हजारांचे घोटाळे केले? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत. या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार. त्यांच्यात या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत असेल, अशी आशा करतो, असा टोला सोमय्या यांनी अजित पवारांना लगावला.

पाच हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा

पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे सुरु आहेत. हा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे त्यांना आता तुरुंगात जावच लागणार आहे. कायद्याने होत असलेल्या कारवायांना सामोरे जावं लागणार आहे, असं सोमय्या म्हणाले.