घरताज्या घडामोडीराऊतांनंतर शिवसेनेचा 'हा' नेता तुरुंगात जाणार, किरीट सोमय्यांचे भाकीत

राऊतांनंतर शिवसेनेचा ‘हा’ नेता तुरुंगात जाणार, किरीट सोमय्यांचे भाकीत

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केली आहे. संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड सापडली असून ईडीने ही रक्कम जप्त केल्याचे समजते. परंतु राऊतांच्या अटकेनंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील मोठ्या नेत्यांचा उल्लेख करत शिवसेनेचा आणखीन एक मंत्री लवकरच ईडीच्या ताब्यात जाणार असल्याचं भाकीत ईडीने केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावांसहीत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सध्या तुरुंगात असणाऱ्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. सोमय्यांनी अनेक बड्या नेत्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणारे राऊत जसे तुरुंगात गेले तसा डावा हातही तुरुंगात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उजवा हात असणारे नवाब मलिक जेलमध्ये आहेत. डावा हात अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांचा उजवा हात संजय राऊत तर गेले, डावा आता अनिल परबचं.., असं म्हणत सोमय्यांनी परब लवकरच तुरुंगात जातील अशा इशारा दिला आहे.

दरम्यान, दापोली न्यायालयात अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल झाली आहे. त्याची फायनल ऑर्डर १७ ऑगस्टला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : संजय राऊतांना अखेर अटक, ईडीकडून तब्बल १७ तास चौकशी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -