घरताज्या घडामोडीमलिकांविरोधात एनआयएचा तपास अद्याप बाकी, आगे आगे देखो म्हणत किरीट सोमय्यांचा ठाकरे...

मलिकांविरोधात एनआयएचा तपास अद्याप बाकी, आगे आगे देखो म्हणत किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

Subscribe

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून त्यांना अटक कऱण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका फेटाळली असून नवाब मलिकांना दणका दिला आहे. मलिकांवर अजून एनआयएची कारवाई बाकी आहे. ते अनेक महिने तरी बाहेर येतील असे वाटत नसल्याचे भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची याचिका फेटाळल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारला एक प्रकारे पुन्हा इशारा सोमय्यांनी दिला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आता तर नवाब मलिकांविरोधात एनआयएची टेरर फंडींगमध्ये चौकशी अजून बाकी आहे. मला नाही वाटत अनिल देशमुख आणि नवाब मलिक अनेक महिने तरी तुरुंगातून बाहेर येतील. अजून संजय राऊत, अनिल परब, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईला गती आली आहे. आगे आगे देखो होता हे क्या असा इशारा भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांची याचिका फेटाळली

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीची कारवाई चुकिची असल्याचे म्हणत ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने याचिकेवर सुनावणी करताना याचिका फेटाळली आहे. यामुळे नवाब मलिक आणि राष्ट्रवादीला हा फार मोठा धक्का मानला जात आहे. दाऊदशी संबंध आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपामध्ये नवाब मलिकांना ईडीने अटक केली आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिक यांनी दाऊदशी संबंधित व्यक्तिंसोबत आर्थिक व्यवहार केला. तसेच मालमत्ता खरेदी केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राज्य सरकार सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज खंडीत करतंय, देवेंद्र फडणवीस वीज कापणीवरुन आक्रमक

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -