भावना गवळी स्वतःच्या १०० कोटींच्या घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नका, किरीट सोमय्यांचे वक्तव्य

kirit somaiya serious allegations on bhavana gawali 100 cr scam
भावना गवळी स्वतःच्या १०० कोटींच्या घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नका, किरीट सोमय्यांचे वक्तव्य

शिवसेना खासदार भावना गवळी यांनी स्वतःच्या घोटाळ्याची शिक्षा त्यांच्या आईला देऊ नये, ईडीच्या चौकशीला हजर व्हावे अशी विनंती शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केली आहे. भावना गवळींनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. यामध्ये सईद खानला अटक करण्यात आले आहे. तसेच शिवसेना नेते अर्जून खोतकर यांनीही १०० एकर शेतकऱ्यांची जमीन बळकावली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने खोतकर यांनी जमिनीचा घोटाळा केला असल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांबाबत माहिती दिली आहे. तसेच शिवसेना नेते अर्जून खोतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने १०० एकर जमीन शेतखऱ्यांची बळकावली आहे. त्यांना या जागेवर बिल्डिंग, कॉम्पलेक्स आणि मॉल बांधायचा आहे असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कृपेने या कारखान्याच्या संबंधित १०० एकर जागा गिळंकृत करण्याचा घोटाळा सुरु आहे. ही जागा बिल्डिंग मॉल कॉम्प्लेक्स उभी करण्यासाठी हवी आहे. ती साखर कारखान्यासाठी जागा देण्यात आली होती. त्या जागेची किंमत ४०० कोटी रुपये आहे. सगळी मिळून २४० एकर सुमारे १ हजार कोटीची जागा असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भावना गवळींनी ईडी चौकशीला समोरे जावे

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर घणाघात केला आहे. भावना गवळींविरोधात ईडीने चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये ६९ कोटीची मालमत्ता सईद खान आणि भावना गवळी यांच्या नावे आहे. सईद खानला ईडीकडून अटक झाली आहे. गवळींनी विनंती आहे की, १०० कोटीच्या घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नका आणि ईडीच्या कारवाईला समोरे जा असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे सरकारने अनेक घोटाळे केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.


हेही वाचा : कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठीचे काम अखंडीत सुरू राहील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे