उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने लोकांच्या जीवाशी खेळ मांडलाय, सोमय्यांचा आरोप

kirit somaiya slams uddhav thackeray and sanjay raut pune cp amitabh gupta

भाजपा नेते किरीट सोमय्या पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यासाठी आज पुन्हा ते पुणे महानगरापालिकेत जाणार आहे. पुण्यात दाखल होताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या मदतीने कोरोना काळात जीवाशी खेळण्याचे पाप केले आहे. त्यामुळे कारवाई व्हायला हवी,” आरोप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

“महाराष्ट्राच्या जनतेनी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्धव ठाकरेंना ठेका दिला का?”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केले त्या कंपनीच्या विरोधात पुणे पोलिसांनी पीएमआरडीएने, पुणे महानगरपालिकेने कारवाई का केली नाही? त्या कंपनीने पुन्हा एकदा घोटाळा केला. लोकांचा जीव घेतला… संजय राऊत यांच्या मित्रपरिवार आणि पार्टनरची कंपनी आहे म्हणून? रितसर लोकं मेली हे रिपोर्टमध्ये लिहिले आहे. उद्धव ठाकरेंनी कंपनीला ब्लॉक लिस्ट केले, दुसरी गोष्ट या कंपनाला कंत्राट दिलं कसं गेलं. पीएमआरडीएकडे या कंपनीची काहीच कागदपत्रे नाहीत. अर्ज सुद्धा नाही, तरी त्याला कंत्राट दिले. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्धव ठाकरेंना ठेका दिला का?” असा सवाल सोमय्यांनी केले आहे.

“तसेच याप्रकरणी पुणे पोलीस, पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेला ताबडतोब कोव्हिड घोटाळा करणारी जी कंपनी आहे हेल्थ केअर लाईफ लाईन तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले होते, तक्रार महापालिकेत होऊ दिले नाही. आता बघतो कशी कारवाई करत नाही,” अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

“त्या कंपनीवर कारवाई करावी लागणार, संजय राऊत यांना जाब द्यावा लागणार. संजय राऊत रोज उठून धमकी कोणाला देतात. जर राऊत राऊत यांनी एवढी मस्ती आहे एवढी गुरमी आहे लोकांचा जीव घेणार, पीएमसी बँकेच 10 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंपनीतून क्वीक ब्रेक घेणार, अशाप्रकारे बोगस कंपन्याच्या नावाने कोव्हिड कंत्राट घेणार, महाराष्ट्राच्या लोकांची हत्या करणार आणि त्यांना काय होणार नाही?,” असाही सोमय्या म्हणाले आहेत.

“सुट्टीच्या दिवशी पुणे महापालिकेत 100 लोक घुसली कशी? आज एव्हढा पोलीस बंदोबस्त आहे मग त्यादिवशी हे सगळे का पळून गेले होते? ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर अद्याप अटक का झाली नाही? त्या दिवशी आलेली गुंड कुठून आली होती पुण्याची होती की पिंपरी-चिंचवडची होती”, असा सवाल सोमय्यांनी केला.

किरीट सोमय्या आज पुण्यात दाखल झाल्याने पुणे महापालिकेत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. किरीट सोमय्यांना पुणे पालिकेच्या ज्या पायऱ्यांवर रोखण्यात आले त्याच पायऱ्यांवर पुणे भाजपच्या वतीने सत्कारही होणार आहे.


Nitesh Rane : नितेश राणेंच्या सुटकेनंतर मुंबईत झळकले समर्थनार्थ बॅनर; पोलिसांकडून कारवाई