शिवसेनेचे तुकडे तुकडे झाले आहेत, किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

एक तुकडा इधर, एक तुकडा उधर आणि उद्धव ठाकरेंकडे राहिलेल्या हिश्श्यातला जो तुकडा आलाय त्यात एक डझन आमदाराही दिसत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.

kirit somaiya

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government)अस्थिर झाले असून बंडखोर आमदारांवर शिवसेना नेत्यांकडून (Shivsena Rebel MLA) जहरी टीका केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने बंडखोर आमदारांबरोबरच भाजपवरही हल्लाबोल करत आहेत. त्यावर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी खोचक टीका केली असून शिवसेनेचे तुकडे तुकडे झाले आहेत. एक तुकडा इधर, एक तुकडा उधर आणि उद्धव ठाकरेंकडे राहिलेल्या हिश्श्यातला जो तुकडा आलाय त्यात एक डझन आमदाराही दिसत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. (Kirit Somaiya slapped to shivsena)

हेही वाचा  – त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला आव्हान

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ४० हून अधिक आमदार शिंदे सोबत गेल्याने राज्यभरात शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. यातून दररोज शिंदे गट विरुद्ध उद्धव गटामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर या बंडाळीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह संजय राऊत आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून होत आहे. याच रागातून राऊत रोज बंडखोरांच्या इतिहासाचा पाढा वाचत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखातही राऊत भाजप आणि बंडखोरांचा समाचार घेत आहेत. पण एवढे करुनही शिवसेना एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे इतके दिवस मौन असलेले भाजप नेते आता सक्रिय झाले असून किरिट सोमय्या यांनी आज मीडियाबरोबर बोलताना संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यांवर टीका केली. दरम्यान राऊतांना ईडीने समन बजावले असून त्यांनी कार्यक्रमाचे कारण देत चौकशी पुढे करण्यासाठी ईडीकडे वेळ मागितली. त्यावर ईडीने त्यांना १४ दिवसांची वेळ दिली आहे. यावरही सोमय्या यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की “किती दिवस लांब राहणार? किती दिवस लपणार? पत्राचाळ प्रकरणाचा ठिकाणा नाही. टीएमसी बँक, डीएचएफएल, वाधवान अशा प्रकरणांमध्ये जे पैसे लुटले गेले आहेत, त्यांचा हिशोब प्रवीण राऊतांना द्यावा लागेल. राहुल गांधींना चारवेळा जावं लागलं, अनिल परब चार वेळा गेले. राऊतांना हिशोब द्यावाच लागेल.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दोनदा फोन, भाजप श्रेष्ठींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, शिवसेनेचा इन्कार

तसेच यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांवरही निशाणा साधला. सामना अग्रलेखात महाराष्ट्राला तीन तुकड्यांमध्ये विभागण्याचा डाव असल्याचा भाजपवर आरोप करण्यात आला आहे. त्यावर सोमय्या म्हणाले की “शिवसेनेचेच तुकडे तुकडे झाले आहेत. एक तुकडा इधर, एक तुकडा उधर . उद्धव ठाकरेंकडे राहिलेल्या हिश्श्यात जो तुकडा आला, त्यात एक डझनही आमदार नाहीयेत. आधी त्याच्याकडे बघा. १० दिवसांपूर्वीपर्यंत शिवसेनेचे आमदार म्हणायचे, आमचे नेता उद्धव ठाकरे नॉट रीचेबल आहेत. आज ठाकरेंची दयनीय अवस्था अशी आहे की एकही आमदार उद्धव ठाकरेंना रीचेबल नाहीये, असं सोमय्या म्हणाले.