आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या RTPCR बाबत दुरुस्त निर्देश जारी करणार : किरीट सोमय्या

सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी १४ दिवस होम क्वारंटाईन करणं महत्त्वाचं असणार आहे. तसेच त्यांच्या आगमनानंतर RTPCR निगेटिव्ह येणं बंधनकारक आहे. मुंबईत उतरल्यानंतर उड्डाणे आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी ४८ तासांपूर्वी RTPCR चा अहवाल निगेटिव्ह असणं महत्त्वाचं असणार आहे. अशा प्रकारचं पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना पाठवले होते. मात्र, राज्य सरकार आता हे आदेश मागे घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नवीन दुरुस्त मार्गदर्शक तत्त्वे मुंबई आयुक्तांकडून जारी केली जाणार असल्याचं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी RTPCR अनिवार्य असल्याचं राज्य सरकराने सांगितलं होतं. परंतु BMC ने मार्गदर्शक तत्त्वांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. मात्र, महाराष्ट्र सरकार आणि बीएमसी हे RTPCR निर्देश मागे घेणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. तसेच RTPCR ही चाचणी १२ मर्यादीत देशांतील प्रवाशांसाठीच असणार आहे. आज रात्री नवीन दुरुस्त मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असं विश्वास बीएमसीने मला दिलाय. असं देखील सोमय्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या नवीन व्हेरियंटमुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. कोविड-१९ च्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्रीय आरोग्य सचिवांकडून राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र, आता राज्य सरकार आरटीपीसीआर चाचणी आणि इतर राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी ४८ तासांपूर्वीचा निगेटिव्ह रिपोर्ट मागे घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.