घरताज्या घडामोडीसंजय राऊतांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्यावेत, किरीट सोमय्यांची आक्रमक भूमिका

संजय राऊतांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्यावेत, किरीट सोमय्यांची आक्रमक भूमिका

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात अब्रूनुकसानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या आपली पत्नी मेधा सोमय्या आणि पुत्र नील सोमय्यांसह मुलुंड पोलीस ठाण्यात गेले होते. ठाण्याबाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊतांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश द्यावेत, अशी आक्रमक भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली आहे.

किरीट सोमय्या यांनी आज मुलुंडच्या नवघर पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आयपीसी ५०३, आयपीसी ५०६ आणि ५०९ अंतर्गत पोलिसांनी एफआयआर रजिस्टर करावी. ३५ वर्ष शिक्षण क्षेत्रात शिकवणाऱ्या अलिबागमध्ये त्यांचं शिक्षण झालं. डॉ. अच्युत ओक यांच्या कन्या मेधा त्यांचा अशा पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा प्रवक्ता म्हणजेच त्यांचा भोंगा संजय राऊत यांच्याद्वारे चारित्र्य हनन करून सोमय्या कुटुंबावर दडपण उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो हास्यास्पद आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी नौटंकी बंद करावी, असं आव्हान सोमय्यांनी मुंबई पोलिसांना दिलं आहे. संजय पांडे यांनी देखील काल एक मुलाखत दिली. जे पोलीस स्टेशन एफआयआर रजिस्टर करणार नाहीत, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करणार, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांनी सुद्धा ही एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्या. कारण एका महिलेचे चारित्र्य हनन करून त्यांचे जे शैक्षणिक विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार, असं किरीट सोमय्या म्हणाले.

मुलुंड पोलिसांनी ७ दिवसांत याप्रकरणी कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही सोमय्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा अधिकार,संजय राऊतांचा भाजपला इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -