घरताज्या घडामोडीहसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ, सोमय्यांकडून २७०० पानी पुरावे ईडीकडे सुपूर्द

हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ, सोमय्यांकडून २७०० पानी पुरावे ईडीकडे सुपूर्द

Subscribe

सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड हा कारखाना बेनामी शेअर होल्डर्सद्वारा हसन मुश्रीफ यांचा आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात २७०० पानांचा पुरावा ईडी कार्यालयात जाऊन सुपूर्द केला आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली असल्याची माहितीही किरीट सोमय्या यांनी पुरावे सादर केल्यानंतर दिली आहे. हसन मुश्रीफ कुटूंबीयांने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. त्याचे पुरावे मी आयकर विभागाला सादर केले असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांचे आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रियेत म्हटलं आहे. सोमय्यांनी पुरावे सादर केल्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ईडी कार्यालयात स्वतः जाऊन २७०० पानांचे पुरावे किरीट सोमय्या यांनी सुपूर्द केले आहेत. ईडी कार्यालयात पुरावे दिल्यानंतर सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड हा कारखान्याबाबत माहिती देण्याची विनंती हसन मुश्रीफ यांना केली आहे. सोमय्या यांनी म्हटलं आहे की, ईडीच्या चार अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. २७०० पानी पुरावे सुपूर्द करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ सोमवारी जोर जोरात ओरडत होते. शेतकरी आणि साखर कारखाना, सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड हा कारखाना बेनामी शेअर होल्डर्सद्वारा हसन मुश्रीफ यांचा आहे. हे सगळे पुरावे ईडीकडे सुपूर्द केले असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

किरीट सोमय्यांचे आरोप काय?

सीआरएम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडमधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं कर्ज घेतले असल्याचे दाखवले असून सीआरएम सिस्टीम मधून कर्ज घेणाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे. बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी आर्थिक घोटाळा केला आहे. बाप बेटे दोघांच्या १२७ कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. २०१८-१९ मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. यावेळी बेनामी १२७ कोटींचे व्यवहार समोर आले असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे – मुश्रीफ

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्यांच्या आरोपावर मुश्रीफ यांनी प्रितिक्रिया दिली आहे. सोमय्यांकडून केलेले आरोप तथ्यहीन आणि बिनबुडाचे असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्यात आली आहे. माझ्या १७ वर्षांच्या राजकीय प्रवासात कोणी आरोप केले नाहीत. भाजपसारखे चिक्की घोटाळे आम्ही केले नाही. पुढील २ आठवड्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी अब्रुनुकसानीची १०० कोटींचा दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : किरीट सोमय्यांविरोधात दोन आठवड्यात १०० कोटींचा दावा ठोकणार – हसन मुश्रीफ


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -