घरमहाराष्ट्रकोर्लई गावबंदीच्या आदेशावरून किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

कोर्लई गावबंदीच्या आदेशावरून किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Subscribe

कोर्लई गावबंदीच्या आदेशावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने कोर्लई गावात शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवस गावबंदी घालण्यात आली आहे. सोमय्या यांनी रविवारी देखील यावरून टीका केलो होती. आज देखील ट्विट करत उद्धवा अजब तुझे सरकार असं ट्विट करता निशाणा साधला आहे.

 

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे. “उद्धवा अजब तुझे सरकार, ठाकरे परिवाराचा १९ बंगलो असलेल्या कोर्लई गावात घरबंदी/गावबंदी. ठाकरे सरकार चा आदेश. कोर्लई गावातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या लोकांना प्रतिबंध. शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यापासून पुढील २८ दिवसांपर्यंत ही बंदी लागू राहतील,” असं ट्विट सोमय्या यांनी केलं आहे.

मी येणार कळताच गावबंदी

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या अलिबागमधील कोर्लई गावातील बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी जाणार होतो. त्याबाबत प्रशासनाला कळवलंही होतं. पण मी येणार म्हणताच कोर्लई गावात गावबंदी आणि घरबंदी जाहीर करण्यात आली. मला गावात येण्यापासून रोखण्यासाठीच कोरोनाचं कारण देऊन ही गावबंदी करण्यात आली आहे, असा आरोप करतानाच रायगड, महाराष्ट्रासह देशात अशाप्रकारची गावबंदी कुठे आहे?, कोर्लईतच गावबंदी का?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -