kirit somaiya : आता रश्मी ठाकरे आणि अजित पवार सोमय्यांच्या रडावर

Kirir somaiya and rahsmi thackeray and ajit pawar

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचे एकापाठोपाठ एक असे घोटाळे उघड केल्यानंतर आता माजी खासदार किरीट सोमय्यांचे आगामी लक्ष्य हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहे. किरीट सोमय्यांनी कराडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत या दोघांच्या मालमत्तेच्या ठिकाणी दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले. रश्मी ठाकरे यांच्या अलिबागच्या जागेची पाहणी करायला २७ सप्टेंबरला जाणार आहे. तर अजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची पाहणी करायला जाणार आहे, असे किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले. (Kirit somaiya to visit rashmi thackeray and ajit pawar properties)

याआधीही रश्मी उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याच्या व्यवहारावरून किरीट सोमय्यांनी यांनी आरोप केले होते. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्याच्या निमित्ताने अजित पवार यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले होते. आता हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपानंतर पुन्हा एकदा या दोन्ही ठिकाणच्या मालमत्तांच्या ठिकाणी दौरा करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.

राणेंना बाप बेटा घाबरतात का ?

अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडणार असल्याचे ठाकरे सरकार प्रतिज्ञापत्र देते. तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकर हे बंगला तोडतात. नारायण राणेंचा बंगल्यावरील कारवाईबद्दल विचारल्यावरही किरीट सोमय्या यांनी स्पष्टीकरण दिले. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे हे पर्यावरणमंत्री आहेत. सीआरझेड हा राज्याचा विषय आहे. अशावेळी सत्तेत २१ महिने झाले असतानाही ठाकरे बाप बेटा नारायण राणेंवर कारवाई का करत नाही ? ठाकरे बाप बेटा हे राणेंना घाबरतात का ? असाही सवाल किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.

ठाकरे पवारांची व्ह्यूव्हरचना

हे संपुर्ण सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार चालवत आहेत. त्यांच्याच व्ह्यूव्हरचनेनुसार गृहमंत्रालयाकडून कोल्हापूरला जाण्यापासून जाण्याची कारवाई झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. ठाकरे सरकार आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानेच ही कारवाई झाल्याचे सोमय्या म्हणाले. ठाकरे सरकार कितीवेळा दडपशाली करणार असेही सोमय्या म्हणाले.


हेही वाचा – Kirit Somaiya VS Hasan Mushrif: हसन मुश्रीफांचे सोमय्यांनी उघड केलेले दोन घोटाळे नेमके कोणते? वाचा सविस्तर