“ऐसी दादागिरी नही चलेगी” लिलावती रुग्णालयाच्या कारवाईवरुन सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Kirit Somaiya Traget shivsena uddhav thackeray on lilawati hospital Dismissed Parag Joshi
"ऐसी दादागिरी नही चलेगी" लिलावती रुग्णालयाच्या कारवाईवरुन सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

खासदार नवनीत राणा यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान एमआरआय करताना त्यांचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. याविरोधात शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला होता. शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता लिलावती रुग्णालयाकडून या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा प्रभारी पराग जोशी यांना रुग्णालय व्यवस्थापनाने बडतर्फ केले आहे. यावर अशी दादागिरी चालणार नाही असे म्हणत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लिलावती रुग्णालयाने सुरक्षा प्रभारीवर केलेल्या कारवाईवरुन ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. खासदार नवनीत राणा यांची एमआरआय चाचणी कऱण्यात आली. यावेळी फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आला. दरम्यान परवानगी नसताना फोटो कसे काढले असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला होता. यानंतर रुग्णालयाने कारवाई करत सुरक्षा प्रभारीला बडतर्फ केले आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लिलावती रुग्णालयाच्या कारवाईमुळे रुग्णालयाला पत्र लिहिले आहे. तसेच ट्विट करत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. पराग जोशी यांच्या पत्नीला न्याय हवा आहे. लीलावती हॉस्पिटल नवनीत राणा MRI फोटो व्हायरल घटना. शिवसेनेची धमकी, सुरक्षा प्रभारी पराग जोशी यांना रुग्णालय व्यवस्थापनाने बडतर्फ केले. “ऐसी दादागिरी नही चलेगी” असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण ?

खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये छाती, मान आणि शरीराच्या अन्य भागात वेदना तसेच स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्याने त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. मात्र, नवनीत राणा यांचे एमआरआय स्कॅन करतेवेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वास्तविक, एमआरआय स्कॅनिंग रुममध्ये रुग्णाशिवाय अन्य कोणाला परवानगी नाही, महत्त्वाचे म्हणजे कॅमेरा, मोबाइल अशा इलेक्ट्रॉनिक उपरकरणांनाही मनाई असते. मात्र तरीही, एमआरआय रुममधील नवनीत राणा यांचे फोटो काढले कोणी? यासह अनेक सवाल उपस्थित करत शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. नवनीत राणांचा एमआरआय काढताना फोटो कुणी काढले? एमआरआय रुमपर्यंत कॅमेरा पोहोचलास कसा? नवनीत राणांना स्पॉन्डिलिसिस असताना ऊशी का दिली? असे अनेक सवाल शिवेसना नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनीषा कायंदे यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनेला केले होते.


हेही वाचा : राज सभेच्या पूर्वसंध्येला वसंत मोरेंचं फेसबुक लाईव्ह, MNS पार्ट टाईम कार्यकर्त्यांविरोधात नाराजी व्यक्त