Kirit Somaiya : भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्यामुळे माझ्यावर गुन्हा, सोमय्यांची ट्विट करून माहिती

Kirit Somaiya warning After Sanjay Raut and yashwant jadhav next number is minister yashwant jadhav

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रापर्टीची पाहणी केल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांसंदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. मात्र, पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसमध्ये कलम १८८ अंतर्गत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांना यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी सोमय्यांना हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

छगन भुजबळ यांच्या सांताक्रूझ भागात असलेल्या बंगल्याची पाहणी केल्याप्रकरणी नोटिस देण्यात आल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. ठाकरे सरकार आणि पोलिसांनी माझ्या विरूद्ध आणखी एक नोटीस पाठवली असून भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्याबद्दल माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी ट्विट करत दिली आहे.

१८ फेब्रुवारीला कोर्लई गावाला भेट देणार

कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर १९ बंगले असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. हा दावा कोर्लई गावच्या नागरिकांनी खोडून काढला आहे. त्यामुळे आता १८ फेब्रुवारीला सोमय्या कोर्लई गावाला भेट देणार आहेत. तसेच १९ बंगल्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

सोमय्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, २०१९ मध्ये रश्मी ठाकरे यांनी माझ्या नावावर १९ बंगले करा, अशा प्रकारचं पत्र लिहिलं होतं. तसेच यासंदर्भातील माहिती मी माहिती अधिकरामध्ये प्राप्त केली आहे. परंतु त्या पत्राचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय केलं. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. यावर सबळ पुराव्यांसह जर कोणी वक्तव्य केलं तर भाजपा त्यावर निश्चितच आपलं मत व्यक्त करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय.

राऊतांच्या पार्टनरच्या बेनामी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करणार

हजारो कोविड रूग्णांची हत्या करणारे संजय राऊत यांचे पार्टनरच्या बेनामी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. पुण्याला माफिया सेनेच्या शंभर गुंडांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुणे पोलीस आयुक्तांनी अद्यापही योग्य गुन्हा दाखल केलेला नाहीये. तसेच महाराष्ट्रात दाऊतचे कनेक्शन समोर येत आहेत. त्याचाही पाठपुरवठा करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकार महाराष्ट्र मुक्त करणार

छगन भुजबळ यांच्या सांताक्रूझ भागात असलेल्या बंगल्याची पाहणी केल्याप्रकरणी नोटिस देण्यात आल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं. पोलिसांनी नोटीस दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे चौकशी जाणार आहोत. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणार आहोत. दरम्यान, घोटाळेबाज ठाकरे सरकार महाराष्ट्र मुक्त मी करणार, असं सोमय्यांनी म्हटलंय.


हेही वाचा : UP Elections 2022: यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री राम विमानतळाच्या रनवे बांधकामाला सुरूवात, पहिल्या टप्प्यात किती होणार खर्च?