राऊतांकडून आचारसंहितेचं उल्लंघन, किरीट सोमय्या कारवाईच्या मागणीसाठी दिल्ली दौऱ्यावर

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्ली दौऱ्यावर जात असल्याची माहिती दिली आहे.

kirit somaiya visits Delhi election commission to demand action on sanjay raut
राऊतांकडून आचारसंहितेचं उल्लंघन, किरीट सोमय्या कारवाईच्या मागणीसाठी दिल्ली दौऱ्यावर

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीदरम्यान अचारसंहितेचं उल्लंघन केला असा आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. राऊतांवर कारवाई करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यासाठी किरीट सोमय्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींबाबत सोमय्या तक्रार करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीमध्ये ज्या अपक्ष आमदारांनी भाजपला मत दिले त्या आमदारांची नावे समोर आणणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी सोमय्या दिल्लीत जाणार आहेत. सोमय्यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींवरुन भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. ऐनवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीमुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला. हार शिवसेनेच्या जिव्हारी लागली असून विश्वासातील अपक्ष आमदारांनीच भाजपला मतदान केल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या आमदारांची नावे सांगितली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्ली दौऱ्यावर जात असल्याची माहिती दिली आहे. संजय राऊतांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्ली दौऱ्यावर जात आहे. निवडणू आयोगाकडे संजय राऊत यांची निवड बाद करण्याची मागणी करणार आहे. “संजय राऊत यांनी अर्धा डझन आमदारांची नावे उघड केली आणि त्यांनी आपला विश्वासघात केल्याचे सांगितले आणि त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार मते दिली नाहीत असे संजय राऊत म्हणाले असल्याचे किरीट सोमय्यांनी ट्विट करत सांगितले आहे.

राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. दरम्यान भाजपला महाविकास आघाडीसोबत असलेल्या अपक्ष आमदारांनी मतदान केल्यामुळे शिवसनेचा उमेदवार पराभूत झाला. भाजपला मतदान करणाऱ्या अपक्ष आमदारांवर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.तसेच या आमदारांनी शिवसेनेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप राऊतांनी केला.


हेही वाचा : महिलेविरुद्ध द्वेषाचे खराब प्रदर्शन, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गौतम गंभीरचे नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ ट्विट