घरताज्या घडामोडीKirit somaiya vs Hasan mushrif : दोन दिवसात दोन कॉंग्रेसच्या बड्या मंत्र्यांची...

Kirit somaiya vs Hasan mushrif : दोन दिवसात दोन कॉंग्रेसच्या बड्या मंत्र्यांची पोलखोल – चंद्रकांत पाटील

Subscribe

भाजपच्या रडारवर केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी नाही. येत्या दोन दिवसात दोन बड्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे विषय समोर येणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. भाजपच्या रडावर जे अन्याय करणारे, भ्रष्टाचार करणारे आणि महिलांना त्रास देणारे लोक आहेत ते भाजपच्या रडावर आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले . राष्ट्रवादीने सुरूवातीपासूनच गृह खात्याचा दुरूपयोग केला आहे. त्यामुळे सुरूवातीलाच मी राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद देऊ नका असे सांगितले होते. किरीट सोमय्यांनी केलेल्या दाव्याला कायदेशीर मार्गानेच उत्तर द्यावे. कायदेशीर लढाई कायदेशीर पद्धतीनेच लढावी असेही आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

किरीट सोमय्यांविरोधातील कारवाईत शिवसेनेने आणि उद्धवजींनी आम्हाला काही माहिती नाही. मुख्यमंत्री कार्यालयाचा या घटनेशी संबंध नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गृहमंत्रालयाच्या अधिकारातून हे सगळ घडले असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत कारवाई झालेल्या मंत्र्यांमध्ये एक चतुर्थांश मंत्री हे राष्ट्रवादीचे असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

पवारांनी पाठीशी न घातल्यानेच मुश्रीफांची तब्येत बिघडली

मला जेवढे पवार साहेब माहित आहेत, ते अशा प्रकारणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे कोलकात्यातील शेल कंपन्यांमधील पैशांची एंट्री ही ऑन पेपर दिसत आहेत. म्हणूनच मुश्रीफांची तब्येत बिघडली आहे. पवारांनी आतापर्यंत मोठ राजकरण केले, पण चिल्लर राजकारणात ते पडले नाहीत, असेही चंद्रकांत पाटील यांनी पवारांबाबत बोलताना स्पष्ट केले.

हसन मुश्रीफांना ऑफर नव्हती

भाजपमध्ये मेरीटवर एखाद्याला नाकारतात. तसेच भाजपमध्ये कोणालाही विनाकारण त्रास देण्याचे कल्चर नाही. त्यामुळे हसन मुश्रीफांनी आता हा सगळा ड्रामा बंद करावा असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपने कोणतीही ऑफऱ हसन मुश्यांरीफ यांना दिली नव्हती. त्यामुळे भाजपची ऑफऱ नाकारल्याने त्रास देण्यात येत असल्याचा दावा त्यांनी खोडून काढला.

- Advertisement -

हेही वाचा – Kirit Somaiya VS Hasan Mushrif: खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील, सोमय्यांचा फक्त वापर, हसन मुश्रीफांचा पलटवार


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -