संजय राऊतांनंतर पुढचा नंबर ‘या’ मंत्र्याचा, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा

Kirit Somaiya warning After Sanjay Raut and yashwant jadhav next number is minister yashwant jadhav

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेते अडचणीत आले आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे सुरु आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याच्या अडचणी वाढणार आहेत. कारण या मंत्र्यावर ईडीची कारवाई होण्याची शक्यता आहे. भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुढचा नंबर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगितले.  पुढील नंबर मुश्रीफांचा असून त्यांनी काळजी घ्यावी असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. ईडीने यशवंत जाधव यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दादरमधील घरावर जप्ती आणली आहे तर अलिबागमधील ८ प्लॉट जप्त केले आहेत. यानंतर आता पुढील नंबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

काही दिवसानंतर मेहुणे तर आहेतच

आयएनएस विक्रांतसंबंधित प्रश्न केला असता किरीट सोमय्या म्हणाले की, शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर असे समजले आहे की, माझ्याकडे १० टक्के येत होते. मग बाकी कुठे जात होते. बाकीचे पैसे वरच्या साहेबांकडे आहेत. यांचे वरचे साहेब बांद्रामध्ये आहेत. ओह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही कितीही खोट्या एफआयआर दाखल केल्या तरी तुमच्या घोटाळेबाजांना योग्य ठिकाणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळी मालमत्ता जप्त व्हायला लागली तेव्हा दिवसासुद्धा भूत दिसायला लागतात. तुम्ही तर साक्षी आहात यशवंत जाधव प्रकरणी दिल्लीत पाठपुरावा करत आहोत. आता हसन मुश्रीफ यांनी जी माया जमवली आहे त्यांनी आता सांभाळावे, महाराष्ट्राच्या जनतेला लुटला आहे. कुठे कुठे पैसे लपवले आहेत. १५८ कोटींचे पुरावे मी दिले आहेत. सगळ्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. काही दिवसानंतर मेहुणे तर आहेतच असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

५८ कोटींचा पुरावा राऊतांनी द्यावा – सोमय्या

आयएनएस विक्रांतवर स्पष्टीकरण रोज त्यांना द्यावे लागत आहे. १० ते ११ वर्षांपूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने विक्रांतचा लिलाव करण्याचा निर्णय़ घेतला. त्यावेळी भाजप आणि शिवसेना एकत्र होते. दोघांच्याही खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. विक्रांत भंगारात काढू नका असा विषय होता. संजय राऊत जे म्हणतात ना ते लिहून काढा त्यामध्ये किती विसंगती दिसतील. काल त्यांनी पलटी मारली आहे. पोलिसांनी काय आरोप केले त्यामध्ये किती गोळा केले तो विषय नाही. ५८ कोटींचा आकडा संजय राऊतांना का नाही विचारला? त्यांच्याकडे पुरावा आहे. बिल्डरांकडून पैसे नील सोमय्यांच्या कंपनीत गेले आहेत. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतमध्ये पैसे लाटले याचे ब्रम्हज्ञान संजय राऊतांना ११ वर्षानंतर का झाले. पोलिसांनी जी एफआयआर केली आहे. गुन्हा ५८ कोटी लाटले असा आहे. ५८ कोटींचा आकडा कोणी दिला. ४ बिल्डर, मनी लाँड्रिंग संजय राऊतांनी सांगितले.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलीस रात्री १ वाजता कोणी नागरिक आल्यावर गुन्हा दाखल करुन घेतात. सोमय्यांना अटक करा पण यानंतर संजय राऊतांनी पलटी मारली. आता मी मुंबई पोलिसांना घेरणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरणार आहे. माझ्यावर एफआयआर केली आहे. ५८ कोटींचे पुरावे द्या, पुरावा नसताना पोलीस गुन्हा दाखल करु शकत नाही. तुम्ही पुरावा द्या त्याशिवाय कलम कसे लावले याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे लागणार असल्याचे सोमय्या म्हणाले.


हेही वाचा :  संयुक्त राष्ट्राने रशियाला मानवाधिकार परिषदेतून केले निलंबित; भारत मतदानास अनुपस्थित