NSEL 5600 कोटी घोटाळा, मोतीलाल ओसवाल कडून सोमय्यांनी लाखो रुपये घेतले; संजय राऊतांचा गंभीर आरोप

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ट्विटरवरुन नवीन गौप्यस्फोट करण्याचा इशारा राऊत यांनी दिला होता. या इशाऱ्यानुसार त्यांनी बुधवारी सकाळी किरीट सोमय्यांच्या नव्या घोटाळ्याची महिती दिली आहे. संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक ट्विट केलं आहे.

sanjay raut accuses on kirit Somaiya funding Somaiya's organization from company investigated by ED

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ट्विटरवरुन नवीन गौप्यस्फोट करण्याचा इशारा राऊत यांनी दिला होता. या इशाऱ्यानुसार त्यांनी बुधवारी सकाळी किरीट सोमय्यांच्या नव्या घोटाळ्याची महिती दिली आहे. संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक ट्विट केलं आहे. यामध्ये संजय राऊत यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड म्हणजेच एनसएसईएलसंदर्भातील ५६०० कोटींच्या घोटाळ्यामध्ये सोमय्यांनी लाखो रुपये आपल्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतल्याचा आरोप केला आहे.

“एनसएसईएलच्या ५६०० कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याच्या चौकशीची मागणी किरीट सोमय्यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ईडीने चौकशी केली. स्वतः किरीट चौकशीसाठी कंपनी शिपायांचे घरी गेले. तमाशा केला. २०१८-१९ असे दोन वर्ष सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले”, असा आरोप राऊत यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. ट्विटरवरुनही यासंदर्भात पोस्ट शेअर करताना त्यांनी ‘किरीट का कमाल’ नावाखाली हे आरोप केले आहेत.

बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केला होता. युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून संशयास्पद देणग्या घेतल्याचा आरोप कालही राऊत यांनी केला होता. “पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी म्हणून आहे. त्या मेट्रो डेअरीच्या डिइन्व्हेस्टमेंट प्रक्रियेत गैरव्यवहार झालेले आहेत. त्यासंदर्भात ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये देण्यात असून खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. अशा कंपन्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिष्ठानला देणग्या कशा देतात? अशा एकूण १७२ कंपन्या आहेत.” असं राऊत यांनी म्हटलेलं तसेच यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलेलं.


हेही वाचा – मुंबईत ncb पुन्हा ॲक्शन मोडमध्ये अनेक तरुणांना अटक