घरताज्या घडामोडीयशवंत जाधवांनी १ रुपयांचा शेयर ५०० रुपयांना विकला, कोट्यावधींच्या कमाईच्या घोटाळ्याचा सोमय्यांनी...

यशवंत जाधवांनी १ रुपयांचा शेयर ५०० रुपयांना विकला, कोट्यावधींच्या कमाईच्या घोटाळ्याचा सोमय्यांनी वाचला पाढा

Subscribe

शिवेसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ३ लाखाची कंपनी १५ कोटी रुपयांची केली. १० दिवसांमध्येच त्यांनी ३ लाखाचे १५ कोटी रुपये केले. कोलकातामधील एका कंपनीला १ रुपयांचा शेअर ५०० रुपयांना विकला आणि १५ कोटी रुपये केले असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफिया सेनेचा हा नवा घोटाळा असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधताना महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घोटाळ्यामागचा पाढा वाचला आहे. सोमय्या म्हणाले. छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यशवंत जाधांनी मागे टाकले आहे. छगन भुजबळांनी २०१३ मध्ये घोटाळा केला होता. १०० कोटी रुपयांचे मनी लॉड्रिंग, खोट्या कंपन्यांद्वारा आर्मस्ट्रॉंग कंपनीमध्ये १०० रुपयांचे शेअर १० हजार रुपये कोलकाता मधील कंपन्यांनी घेतले आणि १०० कोटी रुपयांचे चेक आर्मस्ट्रॉंगच्या खात्यात आले. काही लाखांचे १०० कोटी रुपयांचे मनी लॉड्रिंग भुजबळ यांनी केले आहे. तर मुख्यमंत्र्यांचे शागीर्द यशवंत जाधव यांनी करोडो रुपये महापिलाक कंत्राटदाराकडून आलेले त्यातून मनी लाँड्रिंग केले आहेत असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

- Advertisement -

यशवंत जाधवांनी असा केला घोटाळा

दरम्यान किरीट सोमय्या म्हणाले की, यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळ्यातील एक उदाहरण आहे ते म्हणजे १ रुपयाचा शेयर यशवंत जाधव यांनी कोलकातामधील कंपनीला ५०० रुपयांना विकला. उदय शंकर महावार या व्यक्तीने त्याच्या शेल्फ कंपन्या आहेत. यशवंत जाधवांचा १ रुपयाचा चेक त्याच्यासमोर ५०० रुपयांचा चेक अशा पद्धतीने संपूर्ण कंत्राटदारपासून कसे रुपये घेतले. कसे व्यवहार झाले? आयएस अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश असून असेच १५ कोटी रुपयांचे १०० टक्के पूर्ण उदाहरण म्हणजे यशवंत जाधव यांची प्रधान डीलर्स कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २० मार्च २०१२ साली झाली आहे. अवघ्या १० दिवसात ३० मार्चरोजी ज्या कंपनीने एका रुपयाचा व्यवहार केला नाही. ती कंपनी यशवंत जाधव यांच्याकडून ३ लाख रुपये घेते. जाधव परिवाराने ३ लाख रुपयांचा चेक दिला. त्याच्यासमोर मनी लॉंड्रिंग १५ कोटी रुपये केली. १ रुपयाचा शेअर ५०० रुपये दराने, कोलकातामधील बोगस कंपन्यांनी शेअर विकत घेतले. १५ कोटी रुपये १० दिवसात आणि कालांतराने जाधव परिवाराच्या खात्यात १५ कोटी रुपये झाले.

जाधव परिवाराकडे १५ कोटी कसे आले?

यशवंत जाधव यांच्या खात्यात १ कोटी ९९ लाख ५० हजार रुपये, यामिनी जाधव २ कोटी रुपये, निखिल जाधव ५० लाख, यतिन जाधव ५० लाख, सुनंदा मोहिते ५ कोटी, शरयु ट्रेडिंग ३ कोटी, क्रषिदा ट्रेडर २ कोटी ५० हजार अशा प्रकारे यशवंत जाधव यांनी मनी लॉड्रिंग केली आहे. कंपनी मंत्रालयाने याची चौकशी केली तेव्हा जो पत्ता दिला होता. त्या ठिकाणी कंपनीच नव्हती. केवळ कागदोपत्री कंपनी होती. यशवंत जाधव यांची कमाल आणि अशी कमाल फक्त माफिया सेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच ही लोकं काम करु शकतात. ३ लाखाचे १५ कोटी रुपये झाले.

- Advertisement -

कंत्राटदार कुठले?

यशवंत जाधव यांनी ज्या कंत्राटदारांच्या मार्फत घोटाळा केला ते कंत्राटदार हिंदमाताच्या नालेसफाईचे आहेत. घाटकोपरच्या नाले सफाईचे आहेत. हा जो घोटाळ्याचा पैसा आहे तो मुंबईतील नाले सफाईचा पैसा आहे. म्हणजे नाले सफाईचे पैसे उद्धव ठाकरेंच्या सेनेने अशा प्रकारे खाल्ले म्हणून मुंबई दरवर्षी पावसात बुडते याचा हिशोब ठाकरे देणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या यंत्रणेनेने तपास केलाच क्लीन चीट मिळेल

४ डिसेंबर २०१४ रोजी आय़कर विभागाने एक आदेश काढला. तो उदय शंकर महावार हा भारतातील टॉप १०० मधील हवाला ऑपरेटर आहे. आयकर विभागाने लुक आउट नोटीस काढली. ५०० कोटी रुपयांचे व्यवहार आयकरने दिले असून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देलि होते. उद्धव ठाकरे सोनिया गांधी यांच्यासोबत गेले त्यामुळे उदय शंकर महावार हवाला ऑपरेटर असतील. कारण हे महावार सोनिया गांधींच्या नॅशनल हेरॉईडमध्ये मनी लॉड्रिंग करताना पकडले गेले आहेत. अशा प्रकारे ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक घोटाळा झाला आहे. अजून टोटल करण्याचे काम सुरु आहे. कंपनी मंत्रालय, वित्त विभा, ईडी आणि वित्त मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. कारवाई सुरु झाली आहे. माझी अपेक्षा आहे की, या कारवाईमध्ये ईडीने भाग घ्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एंटी करप्शन विभाग येणार नाही आणि आले तर चौकशी करण्यापूर्वीच क्लीन चीट मिळाली असेल यात काही घोटाळा झाला नाही. म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशीची अपेक्षा आहे. यात असलेल्यांवर कारवाई व्हावी असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महापालिका आयुक्तांनी तक्रार का केली नाही?

संजय राऊत यांचे पार्टनर, परिवाराचे भागिदार सुजित पाटकरची आणखी एक बोगस कंपनी, कशा प्रकारे बोगसगिरी उद्धव ठाकरेंची माफियासेना करत आहे. त्याचे हे उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वी हेल्थ केअर यांनी जे कोविड कंत्राट मिळाले त्याचा घोटाळा काळ्या यादीतील कंपन्यांना कंत्राट आणि त्यावेळी दुसऱ्या कंपनीचे कागदपत्र दिले होते ती म्हणजे इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि ही सुजीत पाटकरची कंपनी आहे. या कंपनीची नोंदणी खोटी केली आहे. अॅड. साहिल हिरानी यांनी तक्रार केली परंतु मरीन पोलीस स्टेशनने तक्रार घेतली नाही. यामुळे साहिल हिरानी ईडी, कंपनी मंत्रालयाकडे गेले. कंपनी मंत्रालयाने नोटीस दिली आणि १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. कंपनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या वकिलाने सही केली तो म्हणतो माझी सही नाही आहे. खोटी सही स्कॅन करुन लावण्यात आली आहे. म्हणजे संजय राऊत मित्र परिवार अशा प्रकारचे धंदे करतात. यांनी मुंबई पालिकेत ५ कोविड सेंटर करण्यासाठी अर्ज केला होता. आयुक्तांनी याला मंजूरीच्या यादीमध्ये ठेवण्यात आले होते. आयुक्तांनी अद्याप एफआयआर का दाखल करत नाही. सुजित पाटकरच्या दोन्ही कंपन्यांनी घोटाळा केला आहे. तरीही आजपर्यंत नगरविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालयाने, पीएमआरडीए आणि महापालिकेने का तक्रार केली नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.


हेही वाचा : नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवारांचे राणेंच्या अटकेवर बोट, म्हणाले पंतप्रधान खुलासा करणार का ?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -