घरताज्या घडामोडीपवारांच्या जावयांकडे इतके पैसे कसे ? किरीट सोमय्यांनी पहिला बॉम्ब फोडला

पवारांच्या जावयांकडे इतके पैसे कसे ? किरीट सोमय्यांनी पहिला बॉम्ब फोडला

Subscribe

पवार परिवाराने महाराष्ट्राला लुटले आहेत. पवारांच्या जावयाकडे इतकी संपत्ती कशी ? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरचे पैसे हे पैसे नातेवाईकांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. तब्बल १ हजार ५० कोटींची बेनामी संपत्ती आली कुठून ? याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. ईडी आणि आयकरने केलेल्या कारवायांकडून दुर्लक्ष व्हावे म्हणून नवाब मलिक आरोप करत आहेत. नवाब मलिकांचे स्वतः अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. त्यांना अंडरवर्ल्ड हे दोन नंबरच्या धंद्यामुळे अतिशय जवळून माहिती आहे, असाही आऱोप किरीट सोमय्या यांनी केला. दिवाळीतला पहिला बॉम्ब मी फोडत असल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला. त्याचवेळी हे सगळ राजकारण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून सुरू आहे. नवाब मलिकांची इतकी क्षमता नाही. ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईवरून लक्ष हटवण्यासाठीच भाजपवर आरोप होत असल्याचे सोमय्या म्हणाले.

पवारांचा दाऊदशी काय संबंध ? 

१९९० च्या दशकातील बाळासाहेब ठाकरेंची भाषण जर नवाब मलिकांनी एकली तर त्यांना कळेल की, दाऊद आणि शरद पवारांचे काय संबंध आहेत. दोन बिल्डरकडे १८० कोटी आयकर विभागाला सापडले. त्या बिल्डरने अजित पवार कुटूंबीयांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. याबाबतचे पुरावे मी सरकारी कार्यालयातून मिळवले आहेत, असाही दावा किरीट सोमय्या यांनी केला. लवकरच याबाबतचा सविस्तर दस्तावेज हा आयकर विभाग आणि ईडीच्या माध्यमातून उपलब्ध होईल. माझ्यावर दहा हजार कोटींचा दावा लावा असेही आव्हान त्यांनी दिले. अजित पवार कुटूंबीयांच्या बॅंक खात्यामध्ये या दोन बिल्डरकडून रक्कम जमा करण्यात आली. सुनेत्रा अजित पवार, पार्थ अजित पवार, अजित पवार यांच्या आई, जावई आणि बहिणीच्या नावावर हे पैसे जमा करण्यात आले. अजित पवारांनी दीड तास पत्रकार परिषद घेतली. पण या आरोपावर अजित पवारांनी एकही उत्तर देण्याची हिंमत दाखवली नाही. संजय राऊत यांनी पीएमसी बॅंक खातेदाऱ्यांचे ५५ लाख परत दिलेत का ? हे सांगावे असाही प्रश्न किरीट सोमय्यांनी केला. संजय राऊत जे इतक्यांदा भाजपच्या नेत्यांना बोलतात ते ५५ लाखांच्या मुद्द्यावर गप्प का ? असाही सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. हे सर्व पैसे पीएमसी खातेदारांचे लुबाडून घेतले असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.

- Advertisement -

पवार, ठाकरेंच्या सांगण्यावरूनच आरोपसत्र सुरू

अजित पवारांच्या आईच्या नावे ५.३४ कोटी रूपये, पार्थ अजित पवार ५ कोटी ,शिवालिक वेंचर्स ५० कोटी असे पैसे ट्रान्सफऱ करण्यात आले आहेत. शिवाय जावई मोहन पाटील, नीता पाटील, सुनेत्रा पवार यांच्या नावेही पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. हे एका कंपनीतील पुरावे आहेत. असे अनेक व्यवहार आहेत. त्यामुळेच हा आकडा १ हजार कोटींवर जाण्याची शक्यता असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. समीर वानखेडे, अमृता फडणवीस यांच्या नावे सुरू असलेले राजकारण हे फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिक यांची इतकी क्षमता नाही. हा सगळा विषय मूळ ईडी आणि आयकर विभागाच्या छापेमारीवरून लक्ष हटविण्यासाठी सुरू आहे. त्यामुळेच १९ दिवस छापेमारी सुरू आहे की नाही ? याचेही उत्तर द्यावे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.


हेही वाचा – Drug Case : दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार, नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -