घरमहाराष्ट्रसंजय राऊतांवरील मानहानीच्या दाव्याबाबत किरीट सोमय्यांचे ट्विट, म्हणाले...

संजय राऊतांवरील मानहानीच्या दाव्याबाबत किरीट सोमय्यांचे ट्विट, म्हणाले…

Subscribe

किरीट सोमय्या यांच्या पत्नीवर  संजय राऊत यांनी शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांनी  संजय राऊत यांच्या विरोधात 100 कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत आज किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये संजय राऊत यांना मेधा किरीट सोमय्या बदनामी प्रकरणी याचिका नोंदवण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी  शिवडी कोर्ट हजर राहण्यास सांगितले आहे, असे आदेश आज झालेल्या सुनावणीदरम्यान महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिले, असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण – 

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे. मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केले होते. राऊत यांच्या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याचे सांगत मेधा सोमय्या यांनी ही तक्रार दाखल केली होती. यानंतर सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे.

काय आहे घोटाळ्याचा आरोप –

मीरा-भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील १६ शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरू केली आहे. महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी १८ मार्च २०२१ रोजी शासनाला अहवाल सादर केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -