हसन मुश्रीफांचा दुसरा १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्यांनी केला उघड

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यामध्ये मुश्रीफांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

kirit somaiya

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा आर्थिक घोटाळा उघड केला आहे. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखानामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. यामध्येही पुर्वीसारखाच कोलकत्यातील शेल कंपन्यांद्वारा ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत. अशा कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करुन तो पैसा आपल्याकडे घेतला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच यापुर्वीही किरीट सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्याविरोधात केला आहे. त्या आरोपांचे पुरावे आपल्याकडे असून लवकरच ते ईडीकडे सुपूर्द करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. पहिल्या घोटाळ्यातील २७०० पानी पुरावे ईडीला सोमय्यांनी सुपूर्द केले आहेत.

मुश्रीफांचा दुसरा घोटाळा कोणता?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचा दुसरा आर्थिक घोटाळा उघड केला आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांनी असे म्हटलं आहे की, अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यामध्ये मुश्रीफांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. यामध्ये त्यांनी कोलकत्त्यातील शेल कंपन्यांद्वारे ज्या कंपन्या बंद पडल्या आहेत. अशा कंपन्यांच्या नावे बोगस अकाऊंट उघडले आणि एजंटने दोन लेयरमध्ये तो पैसा आपल्याकडे वळवून घेतला आहे. यामध्ये दोन पारदर्शी एजंट असून ते मुश्रीफांचे जावई आहेत.

२०२० मध्ये हा कारखाना ब्रीक्स इंडिया कंपनीला देण्यात आला आहे. परंतु या ब्रीक्स कंपनीला कोणताही अनुभव नाही. ब्रीक्स इंडियाला २०२० मध्ये सहकार मंत्रालयाने दिला आहे. ब्रीक्स इंडिया लिमिटेड ही बेनामी कंपनी आहे. यामध्ये ९८ टक्के शेअर कॅपिटल हे कोलकत्त्याच्या शेल कंपन्यांमधून आले आहेत. त्यामध्ये दोनच पारदर्शक शेअर होल्डर आहेत. ते हसन मुश्रीफ यांचे जावई आहेत. ब्रीक्स इंडिया लिमिटेडचे आणि सर सेनापती कारखान्याचे व्यवहार ५० कोटींचे झाले आहेत. यात कंपनीत जे पैसे आले आहेत. ते अपारदर्शक आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेने लिलाव केला असून त्यामध्ये किती शेअर होल्डर्स आले, किती डिलर आले त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. म्हणून या घोटाळ्याची चौकशी सुरु केली असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सरसेनापती घोरपडे कारखान्यात १०० कोटी पैकी, ९८ टक्के बोगस पैसे वापरण्यात आले आहे. सगळा पैसा बोगस कंपन्यांद्वारे आला आहे. मुश्रीफांनी स्पष्ट करावे की, आपला आणी अप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ परिवाराने या कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. यामध्ये कोलकत्यातील शेल कंपन्यांद्वारा बोगस अकाऊंट उघडून एजंटद्वारे कॅश व्यवहार करुन आपल्याकडे पैसे घेतला आहे. याबाबत उद्या ईडीकडे पुरावा सुपूर्द करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, सोमय्यांचा गंभीर आरोप