‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ राजकीय परिस्थितीवर किशोर कदमांची ‘समाजभान’ राखणारी कविता

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपच्या आधारावर प्रसिद्ध कवी आणि अभिनेते किशोर कदम(kishor kadam) यांनी एक कविता लिहिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या राजकारणात(maharshtra poliics) मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्यामुळे एकनाथ शिंदे(eknath shinde) आणि उद्धव ठाकरे9uddhav thackeray) असे दोन गट झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत अनेक आमदारांनी बंडाळी केली आणि हे सगळे आमदार गुवाहाटी येथे गेले. दरम्यान गुवाहाटीला गेलेले बंडखोर आमदारांपैकी एक म्हणजेच शिवसेनेचे(shivsena) सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिप मध्ये आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या गावाकडील एका वेगळ्या ठसक्यात बोलले आहेत. आता त्यांच्याच या ऑडिओ क्लिपच्या आधारावर प्रसिद्ध कवी आणि अभिनेते किशोर कदम(kishor kadam) यांनी एक कविता लिहिली आहे. किशोर कदम हे ‘सौमित्र'(saumitra) या नावाने कविता लिहितात.

 

आणखी वाचा – आता ED कार्यालय बंद…मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आस्ताद काळेच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं उत्तर

सध्या राज्यातील राजकारणावर विविध क्षेत्रांमधून प्रतिकिया येत आहेत. ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!’ शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील(shivsena MLA shahaji bapu patil) यांचे हे शब्द सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण या संवादामधील किंवा या ऑडिओ क्लिप मधील गमतीचा भाग भाग बाजूला ठेऊन कवी सौमित्र यांनी महाराष्ट्र राज्यातील एकूणच राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी एक अप्रतिम कविता रचली आहे. ‘सौमित्र'(saumitra) नेहमीच सामाजिक घटनांवर आपल्या कवितेमधून व्यक्त होत समाजभान राखत असतात. ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!’ यांच संवादाच्या आधारे ‘सौमित्र’ यांनी कविता लिहिली आहे.

आणखी वाचा – तिसरी घंटा झाली… मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

‘सौमित्र’ यांची कविता वाचा

 

काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील

काय समाज काय उमेदवार काय पक्ष
काय आमदार काय खासदार काय लक्ष

काय नेता काय जनता काय विश्वास
काय खरं काय खोटं काय आभास

काय श्रीमंत काय मध्यमवर्ग काय गरीब
काय सुदैव काय दुर्दैव काय नशीब

काय मतदार काय कॅांन्टीट्यूएंसी काय सत्ता
काय फायस्टार काय थ्री स्टार काय गुत्ता

काय भाषणं काय घोषणा काय नारे
काय मौसम काय वादळ काय वारे

काय विचार काय बांधिलकी काय तत्वं
काय पक्षनेता काय कार्यकर्ता काय स्वत्वं

काय बातम्या अन् अग्रलेख काय संपादक
काय ढोबळ वैचारिक काय आस्वादक

काय चॅनल काय मीडिया काय पेपर
काय शिणिमा काय ष्टोरी काय ठेटर

काय फेसबुक काय वॅाट्सप काय ट्विटर
काय ब्रिलियंट काय बकवास काय चीटर

काय युपी काय महाराष्ट्र काय बिहार
काय आर्थर काय येरवडा काय तिहार

काय सकाळ काय दुपार अन् संध्याकाळ
काय विमान काय पायलट काय आभाळ

काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील

 

आणखी वाचा –  ‘आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…’ उद्धव ठाकरेंसाठी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज…

 

आणखी वाचा –  महाराष्ट्र “माफिया”मुक्त, आता मुंबई महापालिका माफियामुक्त करणार, सोमय्यांचा सूचक इशारा

 

अभिनेते आणि कवी अशी ओळख असलेले किशोर कदम(kishor kadam) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून शेअर केली आहे. किशोर कदम म्हणजेच ‘सौमित्र'(saumitra) यांची राजकीय परिस्थिवर( maharashtra politics) भाष्य करणारी ही कविता सोशल मीडियावर सगळ्याच वाचकांच्या पसंतीस उतरत आहे.