घर देश-विदेश मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुलीवर किशोर कदम म्हणाले; "अरे लूट थांबवा रे..."

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुलीवर किशोर कदम म्हणाले; “अरे लूट थांबवा रे…”

Subscribe

पुणे : “अरे लूट थांबवा रे ही …लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ?”, असा सवाल अभिनेता आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी केला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विनाकारण दोन वेळा टोल आकारला जात असल्याची तक्रार किशोर कदम यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

किशोर कदम यांनी फेसबुक पोस्टवर म्हणाले, “मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस वेवर 240 टोल घेतात .. मध्ये मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात ?
टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्या बद्दल कुणी बोललं का ? आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात ? अरे लूट थांबवा रे ही …लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ?, कुणाकडे तक्रार करायची ?, याला जबाबदार अधिकारी कोण आहेत ?”, असे म्हटले आहे.

- Advertisement -

यापूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी सुद्धा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलसंदर्भात इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला होता. या ऋतुजाने व्हिडीओतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले आहे. यात ऋतुजा म्हणाली, “तुम्हाला काय वाटतं??? अश्या अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते… कारण परिणाम होईल याची खात्री नसते. या वेळी मनात आलं, बोलून बघूया!! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो बरोबर आहे का?”

- Advertisement -

महामार्गाच्या दुरवस्थेवर मनसेची जागर यात्रा

महिनाभरा पूर्वी मनसे नेते अमित ठाकरे हे नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर गेले असताना. अमित ठाकरे यांचा सिन्नर तालुक्यातील टोल नाक्यावर अपमान झाल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यानंतर मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आणि रस्तावरील खड्डेच्या मुद्यांवर मनसेने रविवारी कोकण जागर यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचे नेतृत्व मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले.

हेही वाचा – मुंबई- गोवा महामार्ग का रखडला? राज ठाकरेंनी सांगितले नेमके कारण…

कोकणी माणसाला राग येत नाही – राज ठाकरे

राज ठाकरे सभेत म्हणाले,”हा महामार्ग दूरवस्थेवरून कोकणी बांधव- भगिनीना राग कसा येत नाही, तीच ती माणसे निवडून कशी देता. तीच माणसे तुमच्या आयुष्याचा खेळ करतात, या महामार्गाच्या दुरवस्थेमुळे किती अपघात झाले, रस्त्यावर असलेला खड्डा भरल्या जातो परंतु त्या माणसाचे आयुष्य नाही भरता येत असे म्हणत राज ठाकरे यांनी कोकवासीयांच्या भावनांना हात घातला.”

- Advertisment -