घरमहाराष्ट्र१०० व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून ध्वजारोहण करतील, पेडणेकरांचा विश्वास

१०० व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून ध्वजारोहण करतील, पेडणेकरांचा विश्वास

Subscribe

मुंबई – देशाच्या १०० व्या स्वातंत्र्यदिनी युवानेते आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन ध्वजारोहण करतील, असा विश्वास मुबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवसेना भवनात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, शिवसेना भवनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. ५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांनी ध्वजारोहण केले होते. आता देशाच्या 100 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त आदित्य ठाकरे थेट दिल्लीतून ध्वजारोहण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान; मोदींचा नवा नारा

यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारवही निशाणा साधला. घराणेशाहीबाबत ठाकरेंवर निशाणा का साधताय? भाजपमध्येही नेत्यांच्या मुलाला, मुलीला संधी मिळते. महिलांना सक्षम करण्यासाठी संसेदत आणि विधिमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू झाले पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

मोदींनीही दिल्या शुभेच्छा

स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने भारत आजचा दिवस स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहेत. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून 9 व्यांदा तिरंगा फडकवला, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिला. तसेच मोदींनी नारी शक्ती, मेड इन इंडिया, युवाशक्ती अशा अनेक मुद्द्यावर लक्ष केंद्रीय केले. तसेच यावेळी त्यांनी जय जवान, जय किसान, जय अनुसंधान असा नवा देशवासियांना दिला दिला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -