घरताज्या घडामोडीमुंबईकरांची दिशाभूल करण्याची सुपारी शेलारांनी उचलली आहे - महापौर

मुंबईकरांची दिशाभूल करण्याची सुपारी शेलारांनी उचलली आहे – महापौर

Subscribe

शिवसेनेने मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंत घरांच्या मालमत्ता कर माफीची जी घोषणा केली आहे. यामध्ये एवढा उशीर का लागला?, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली आहे. दरम्यान, मुळामध्ये ही त्यांची पोटदुखी आहे. आज आपण इतकं चांगलं मुंबईकरांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. आधी त्यांना वाटलं की हे होणारचं नाही. त्यामुळे जे आता शक्य झालंय तर आता कुठेना कुठे तरी भांडणं लावायची आणि मुंबईकरांची दिशाभूल करण्याचं काम करण्यासाठी आशिष शेलारांनी सुपारी उचललेली आहे, असं प्रत्यूत्तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांना दिलं आहे.

काय म्हणाल्या महापौर ?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आशिष शेलार यांना प्रत्यूत्तर दिलं आहे. मुळामध्ये ही त्यांची पोटदुखी आहे. आज आपण इतकं चांगलं मुंबईकरांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. आधी त्यांना वाटलं की हे होणारचं नाही. त्यामुळे जे आता शक्य झालंय तर आता कुठेना कुठे तरी भांडणं लावायची आणि मुंबईकरांची दिशाभूल करण्याचं काम करण्यासाठी आशिष शेलारांनी सुपारी उचललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी ५०० चौरस फूट घरांना करमाफी केली आहे. त्याच्यामध्ये हे भांडणं वाढवण्याचं काम करत आहेत. मुंबईकरांना जे काही पाहीजे. ते देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि ती बांधिलकी आपण एकेका गोष्टीतून पाळत आहोत. हीच खरी त्यांची आता पोटदुखी आहे. त्यामुळे कुठेच काही नसल्यामुळे आग लावण्याचं काम त्यांच्याकडून गेलं जातंय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

भाजप विरूद्ध शिवसेना

भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले. ज्यावेळी तुम्ही ५०० फुटांच्या कर माफीची घोषणा केली. तेव्हापासूनची सूट मुंबईकरांना दिली पाहीजे. मागील ४ वर्षांपासूनचे जे पैसे तुम्ही घेतले असतील तर ते मुंबईकरांना परत द्या, अशी आमची पहिली मागणी आहे. दुसरीकडे कोरोनाच्या काळामध्ये मध्यमवर्गीयांना सुद्धा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ५०० फुटापर्यंतचा शून्य कर हे धोरण मध्यवर्गीयांना सुद्धा लागू करा, अशी मागणी शेलारांनी केली होती. परंतु आता त्यांच्या मागणीला आणि टिकेला किशोरी पेडणेकर यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. दरम्यान, भाजप विरूद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा पेटला असून आशिष शेलार यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : Covid-19 नियम मोडणाऱ्यांवर गृहमंत्र्यांचे कारवाईचे

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -