किरीट सोमय्या म्हणजे तमाशातला ‘गांजाडीया’, किशोरी पेडणेकरांची कठोर शब्दांत टीका

rape attempted in borivali bjp corporation office mayor pendnekar asked question for bjp womans mla where is your taigiri

भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणजे तमाशातला ‘गांजाडीया’ आहेत, अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. तसेच, किरीट सोमय्या हे केवळ आरोप करण्यासाठी ठेवलेला माणूस आहेत. त्यांना जसे सांगितले जाते तसे ते बोलतात. मात्र त्यांनी केवळ भ्रष्टाचाराचे आरोप न करता त्याबाबत काही पुरावे असतील तर ते सादर करावेत, असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना दिले आहे.

मुंबई महापालिकेत कोविड काळात कोट्यवधी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. महापौर किशोरी पेडणेकर व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्याबाबत पत्रकारांनी महापौर यांना विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.मात्र यशवंत जाधव यांनी यापूर्वीच सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना उत्तरे दिली असून यापुढेही उत्तरे देण्यासाठी ते सक्षम असल्याचे महापौर यांनी सांगितले.

वास्तविक, आम्ही मुंबईकरांचे, पक्षाचे काम करत आहोत. चांगले काम करत आहोत म्हणून मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन आमचे लक्ष विचलित करण्यासाठी किरीट सोमय्या यांच्याकडून जाणीवपूर्वक असे आरोप केले जात आहेत. मात्र आम्ही आमचे लक्ष विचलित होऊ देणार नाही, असे महापौर यांनी म्हटले आहे.

सेल्फ टेस्टिंग करणाऱ्यांची झाडाझडती सुरू

मुंबईमध्ये काही लोक व्यक्तिगत सेल्फ टेस्टिंग करीत आहेत. त्यात पॉझिटिव्ह आल्यावर ते घाबरून सरकारी रुग्णालयात जाऊन कोविड चाचण्या करत नाहीत. त्याबाबत कोणतीही माहिती देत नाहीत. माझ्या परिचितांमध्ये असा प्रकार झाल्याचे मला समजले आहे. मात्र पालिका अशा सेल्फ टेस्ट करणाऱ्यांची माहिती गोळा करीत आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

लता मंगेशकर यांना रुग्णालयात भेटणार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोविडची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना शनिवारपासून ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या लवकरात लवकर बऱ्या होवोत. त्यांना बघायला रुग्णालयात जाणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मात्र जर लता मंगेशकर यांना रुग्णालयात भेटू शकले नाही तरी डॉक्टरांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

मुंबईत कोविड लसीचे दोन डोस घेऊन ९ महिने झालेल्या फ्रंट लाईन, हेल्थ वर्कर, ज्येष्ठ नागरिकांना पालिका व इतर केंद्रांवर लसीचे बूस्टर डोस दिले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.
सध्या,कोविडबाबत घालून दिलेल्या निर्बधांचे पालन नागरिकांकडून काटेकोरपणे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या घटली असून हे पालिका प्रशासन व समस्त मुंबईकरांचे यश आहे, असे महापौर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : Covid cases in Delhi: दिल्लीत तिसऱ्या लाटेचा कहर ; २४ तासांत २१ हजार २५९ नवे रूग्ण , २३ रूग्णांचा मृत्यू