‘आम्हाला वाटलं बबली मोठी झाली पण बबली नासमझ’, किशोरी पेडणेकरांची नवनीत राणांवर टीका

Kishori Pednekar criticizes Rana couple gave statement against thackeray government for publicity
राणा दाम्पत्य प्रसिद्धीसाठी बरळतायत, किशोरी पेडणेकरांची टीका

खासदार नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यावर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणांच्या टीकेला मुबंई माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला वाटलं बबली मोठी झाली परंतु बबली नासमझ अशी टीका पेडणेकर यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रात दंगली घडवण्यासाठी विरुद्ध दिशेने भोंगा वाजवण्यात येत आहे. एक भोंगा आहे तर दुसरा सोंगा आणि एक अॅम्प्लिफायर असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना खासदार नवनीत राणा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवनीत राणा यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला या प्रश्नावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, हल्लाबोल नाही तर याला खाज म्हणतात, ही मोठी खाज आहे. जाणूनबुजून मुंबईत दंगलसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. याला खाज म्हणतात. हल्लाबोल करण्यासारखे मुख्यमंत्री नाहीत. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात आपल्या कामाच्या शैलीमुळे नंबर १ आलेत ती खरी पोटदुखी आहे. एकाची बेंबीदुखी तर एकाची पोटदुखी आहे. भोंगा आहे तर दुसरा सोंगा आहे. त्यांचा अॅम्प्लिफायर तर दुसरा कोणीतरी आहे. अॅम्प्लिफायर म्हणत किशोरी पेडणेकर यांनी नाव न घेत्या किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत निवडणूक लढवावी असे आव्हान दिलं आहे. यावर किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली. तुझी लायकी आहे का? लोकशाहीने अधिकार दिलेत म्हणून काहीपण बोलायचे का? तु नाही शिकवायचे आम्हाला, तुम्ही स्वतः खासदार आहात. त्या प्रमाणे तुमचे वर्तन असू द्या. नंतर जे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये जो नासमझपणा होतो अजूनही तसाच आहे. आम्हाला वाटले होते बबली मोठी झाली पण मोठी झाली नाही. बबली नासमझ आहे. मागचा अॅम्प्लिफायर लावला जातो आहे. मग ती खाज वाढत आहे. पण त्या खाजेवर आमच्याकडे औषध असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

बाळासाहेब ठाकरे घराणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय यांना प्रसिद्धी मिळूच शकत नाही. सगळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुरु आहे. आपण पाहिले आहे. दोन दिवसांपूर्वी कोण अॅम्प्लिफायर येऊन भेटले आहेत. उलट शिवसेना अशा जेव्हा आव्हानांना समोरे जाते तेव्हा आम्ही आधीच उजळलो आहोत आणि अजून उजळू असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

यांना आता कळून चुकले आहे

असे भोंगे आणि असे सोंगे यांना लागणार आहेत. यांना आता कळून चुकले आहे की, आपला आवाज अॅम्प्लिफायर लावून वाढवला पाहिजे. शिवसेनेने संघर्ष करुन मुंबई महापालिका जिंकली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणी धोरण आणले आहे ते श्रीमंतांसाठी नाही तर मध्यमवर्गीय आणि चाळीत राहणाऱ्यांसाठी आहे. हे पहिले मनपाच्या शाळांमधील पटा बाबत बोलत होते आता विद्यार्थ्यांसाठी लाईन लागत आहे. शाळेचे स्तर उंचावले आहे. यानंतर ५०० चौफू घर ज्याचा कर माफ केला आहे. असे अनेक प्रश्न शिवसेनेकडून सोडवण्यात आले आहेत. म्हैस किंवा गाय पळवायची असेल तर विरुद्ध दिशेले घंटा वाजवली जाते. विरुद्ध दिशेला भोंगा आणि सोंगा वाजवला जात आहे. महागाई वाढली त्यावर बोलायचे नाही. १०० नाही तर १००० दिवस उलटून गेले त्यावर आम्ही बोलणार नाही. आम्ही आमच्या कामाने लोकांपर्यंत जाऊ आणि शिवसैनिकाशी संपर्क साधू.

राणांच्या घरावरील कारवाई नियमानुसार

स्वतःच तुम्ही एवढं सगळं केल्यावर शत्रू तयार होतात. शत्रू तयार झाले का अर्ज वाढतात आणि अर्जांची वाढ झाल्यावर नियमावलीनुसार कारवाई करणं गरजेचे असतात. त्यामुळे उद्या कोणी कोणाच्या घरात गेलं आणि काही बदल करण्यात आला नसेल तर काही घाबरण्याचे कारण नाही. परंतु तुम्ही काही बदल केला असेल तर कारवाई करतील असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवावी, नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान