राणा दाम्पत्य प्रसिद्धीसाठी बरळतायत, किशोरी पेडणेकरांची टीका

Kishori Pednekar criticizes Rana couple gave statement against thackeray government for publicity
राणा दाम्पत्य प्रसिद्धीसाठी बरळतायत, किशोरी पेडणेकरांची टीका

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा प्रसिद्धीसाठी बरळत आहेत. पोलिसांनी आणि न्यायालयाने राणा दाम्पत्यावर कारवाई करावी अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. राणा दाम्पत्याने कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. अशा सी ग्रेड कपलवर कारवाई करण्यात यावी असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार कारवाई करेलच परंतु पोलिसांनी आणि कोर्टानेसुद्धा कारवाई करावी असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. राणा दाम्पत्याला फार सी ग्रेडची पब्लिसिटी लागते त्या पब्लिसिटीसाठीच्या वेडामागे कहीही बरळत आहेत. संविधानिक पदावर काही भाष्य करण्यात येत आहेत. अशा लोकांचा निषेध करत असून त्यांच्यावर पोलिसांनी आणि न्यायालयाने लक्ष द्यावे. त्यांना सोडण्यात आले आहे. अटी-शर्ती घालून सोडल आहे. परंतु ते नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा सी ग्रेड कपलवर कारवाई करावी अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणून आणि सरकार म्हणून दखल घेतली जाईल असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

जाणुनबूजुन महाराष्ट्रात हे पिल्लु सोडण्यात आले

खाजगी काय असते हे त्यांना कळत नाही. तुरुंगातून १४ दिवसांनी सुटल्यानंतर नवरा भेटल्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी काही वाटले नाही का? कोणाच्या समोर करतो आहे. काहीच नाही वाटले. मग तुमचं काय खाजगी आहे. तुम्ही स्पाँडिलायसीस म्हणून चाचणी करताय आणि मार वरुन करुन प्रसिद्धीसाठी करत असाल तर ते कसं प्रायव्हेट होईल. बेताल, विसंगत बोलणं आणि जाणुनबूजुन महाराष्ट्रात हे पिल्लु सोडण्यात आले आहे. सरकारने आणि पोलिसांनी कारवाई करावी. कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली, रवी राणांचा गंभीर आरोप