उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, किशोरी पेडणेकरांनी शिंदेवर डागली तोफ

kishori pednekar

मुंबई – दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाने सुरुवात झाली. त्यांनी सुरुवातीलाच एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर निशणा साधला. शिंदेंनी बऱ्याच जणांना पैसे देऊन बोलवलं, पण येथे सगळे स्वतःहून आले आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, वारसा हक्काने सुरू असलेला मेळावा म्हणजे पंकजा मुंडे यांचा मेळावा. शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होतो. तर, बीकेसीवर सुरू असलेला तिसरा मेळावा हा पैसे देऊन बोलवलेला मेळावा आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका भाजपाच्या निशाण्यावर आहे. पण, मुंबई महापालिकेवर २५ वर्ष शिवसेनेचा भगवा फडकला. उद्धवजींवर, बाळासाहेबांवर विश्वास ठेवून लोकांनी निवडून दिलं आहे. आमदार, खासदार, काम करत असलेल्या प्रत्येकावर विश्वासा ठेवून लोकांनी शिवसेनेला निवडून आलंय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.