घरताज्या घडामोडीभोंगा चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट, किशोरी पेडणेकरांचं मनसेवर टीकास्त्र

भोंगा चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट, किशोरी पेडणेकरांचं मनसेवर टीकास्त्र

Subscribe

भोंगा या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण आज मनसेकडून करण्यात आलंय. ३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भोंग्यावरून राजकारण चांगलंच तापलं असताना आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेवर टीकास्त्र केलंय. भोंगा चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट आहे, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

भोंग्यांचा कमर्शियल ट्रेंडिंग स्टंट

किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, भोंग्याची पार्श्वभूमी मनसेने चांगली तयार केली. सामाजिक मग धार्मिक तेढ याद्वारे भोंग्याला चांगली प्रसिद्धी दिली. कमर्शियल काम कसं करता येईल हे मनसेकडून शिकावं. ३ तारखेला मिटिंग घेणार म्हणे. मुंबईचे वातावरण यांनी तापवलं आणि तेवढ्यात हा भोंगा चित्रपट प्रदर्शित करत आहेत. भोंग्यांचा कमर्शियल ट्रेंडिंग स्टंट करण्यासाठी हे सगळं मनसेने केलं आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

भोंगा चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी

भोंगा २०१९ ला प्रदर्शित होणार होता पण त्यावेळी लाव रे तो व्हिडिओ सुरु झाला. आता पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी मनसेने भोंग्याला प्रसिद्धी दिल्याचेही पेडणेकर म्हणाल्या. भोंगा चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. अजाणावर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट पुन्हा एकदा येत्या ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

भोंगा या चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या आशयघन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे. अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल कांबळे, श्रीपाद जोशी, अमोल कागणे, पवन वैद्य, आकाश घरत यांचाही अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं – सुधीर मुनगंटीवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -