घरताज्या घडामोडीसरकार पडू दे, नाहीतर तुला जीवे मारू; किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

सरकार पडू दे, नाहीतर तुला जीवे मारू; किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

Subscribe

महाविकास आघाडीला उद्या बहुमत सिद्ध करावं लागत असतानाच आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे.

शिवसेनेमागील (Shivsena) शुक्लकाष्ट काही केल्या संपत नाहीय. महाविकास आघाडीला (Mahavikash Aghadi) उद्या बहुमत सिद्ध करावं लागत असतानाच आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Former Mayor Kishori Pednekar) यांना धमकीचे पत्र आले आहे. सरकार पडू दे, नाहीतर तुला जीवे मारू, असा मजकूर या पत्रात लिहिण्यात आल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी ना.म. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Kishori Pednekar received threat)

हेही वाचा – शिवसेनेची बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिकेवर सायंकाळी 5 वाजता होणार सुनावणी

- Advertisement -

राज्यातील सरकार अस्थिर झालं आहे. येत्या २४ तासांत राज्यातील सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाचा निर्णय येऊ शकतो असं म्हटलं जातंय. त्यातच, दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांना अशापद्धतीचं पत्र आल्याने शिवसेनेत खळबळ माजली आहे. हे पत्र उरणमधून आल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. या पत्रात पत्ता असून उरणचे आमदार आणि त्यांच्या पत्नीचाही फोटो असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तसेच एक मुलगी हे पत्र घेऊन आल्याचीही माहिती पेडणेकर यांनी दिली.

काय आहे पत्रात?

- Advertisement -

“मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते कर. उद्धव ठाकरेंना सांग. आमच्या अजित पवारांच्या जिवावर मुख्यमंत्री झाला आहेस. जास्त माज करू नकोस असं उद्धव ठाकरेला सांग.”

हेही वाचा

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला दिलेल्या बहुमत चाचाणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात 5 वाजता सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने याप्रकरणी सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

हेही वाचा – राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या होणार बहुमत चाचणी

तसेच, राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagatsingh Koshari) यांनी अनेकवेळा घटनेचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप कायदेतज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी म्हटलं आहे. पहाटेचा शपथविधीही घटनाबाह्य कृत्य होतं, असंही ते म्हणाले. आज त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर विवेचन केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -